शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

‘माणूस वाचविण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 22:37 IST

गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ठळक मुद्दे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉक्टरांना भावनिक आवाहन प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: गेली अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत. पण या घडीला मृत्यूदर नियंत्रणात आणण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा. ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करुया, असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी रविवारी दूरदृष्य प्रणालीद्वारे ठाणे शहरातील सर्व खासगी रूग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढत आहे. ही चिंतेची बाब असून तो दर कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असल्याचे ते म्हणाले. आजपर्यंत आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करीत आलो आहे. यासाठी माझ्यासह राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, खासगी किंवा सरकारी सर्वच रुग्णालयांनी कोविडवरील रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना मानसिक धीर दिला पाहिजे, जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल. त्याचबरोबर फायर, विद्युत आणि आॅक्सिजन यंत्रणा आॅडिट करण्याची आवश्यकता आहे. ते केले तर भविष्यात होणारी मोठी हानीही टळू शकते, असेही ते म्हणाले.* सध्या आॅक्सिजनचा तुटवडा सर्वत्रच आहे. त्यामुळे ज्या रूग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांनाच आॅक्सिजन देण्यात यावा, असे सांगून तातडीच्या वेळी आॅक्सिजनसाठी महानगरपालिका मदत करेल, असेही आश्वासन त्यांनी दिले.* यावेळी डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांना मोकळेपणाने उत्तर देताना त्यांनी ही वेळ एकजुटीने काम करण्याची आहे. माणूस वाचविण्यासाठी शर्थीने प्रयत्न आणि त्यांना मानसिकरित्या धीर देण्याचीही आहे. त्याचबरोबर कोविड काळात सुरु असलेल्या कामाबद्दल डॉक्टरांसह सर्वांचे अभिनंदन केले.* प्रारंभी महापौर नरेश म्हस्के यांनी डॉक्टरांशी संवाद साधताना कोविड काळात काम करताना काय अडचणी येत आहेत याचा आढावा घेतला. महापालिकेच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. कोविड असो किंवा आरोग्याचा प्रश्न असो ठाणे महानगरपालिका सातत्याने डॉक्टरांच्या पाठीशी उभी राहिली आहे आणि यापुढेही सोबत राहील,असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.* महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील डॉक्टरांनी केलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी खासदार राजन विचारे हेही उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस