शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयलानी देणार राजीनामा, महापौरपदाचा तिढा सुटण्याची चिन्हे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 03:15 IST

मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली.

उल्हासनगर - मीना आयलानी दोन दिवसांत महापौरपदाचा राजीनामा देणार असल्याचे आश्वासन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ओमी कलानी यांना दिल्यावर, त्यांनी असहकार्याची भूमिका मागे घेतली. यामुळे विशेष समिती सभापतीपदाच्या निवडणुका शांततेत होऊन भाजपा-ओमी टीम व साई पक्षाचे सर्वच समिती सभापतीपदावर उमेदवार निवडून आले.उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची महाआघाडी सत्तेवर आली. तेव्हा भाजपा व ओमी टीमला महापौरपदाची पहिली टर्म प्रत्येकी सव्वा वर्षासाठी विभागून दिली. त्यानुसार आायलानी यांच्या महापौरपदाला ४ जुलैला सव्वा वर्ष झाल्यावर ओमी टीमकडून महापौरपदाच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. आयलानी महापौरपदाचा राजीनामा देत नसल्याने ओमी कलानींसह समर्थक नगरसेवक व पदाधिकारी संतप्त झाले.पंचम कलानींच्या महापौरपदाला खोडा घालण्याऱ्या साई पक्षाच्या उमेदवारांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली. तसेच भाजपा गटनेते जमनुदास पुरस्वानी यांनी मतदानासाठी काढलेला व्हीप नाकारण्याची धमकी दिली. कलानी यांच्या आक्रमक भूमिकेमुळे पालिकेची सत्ता हातून जाण्याची भीती भाजपा गोटात निर्माण झाली. अखेर राज्यमंत्री चव्हाण यांनी आयलानी महापौरपदाचा राजीनामा माझ्याकडे देणार असल्याचे सोमवारी मध्यरात्री सांगितले.महापौरपदाचा राजीनामा आयलानी देणार असल्याचे आश्वासन चव्हाण यांच्याकडून मिळाल्यावर ओमी टीमच्या समर्थक नरगरसेवकांनी महाआघाडीच्या सर्वच उमेदवारांना मतदान करत निवडून आणले. बांधकाम समिती सभापतीपदी साई पक्षाच्या कविता पंजाबी, नियोजन समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या मीना सोंडे, पाणीपुरवठा समिती सभापतीपदी भाजपाच्या सरोजनी टेकचंदानी, सार्वजानिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी साई पक्षाच्या इंदिरा उदासी, प्राथमिक व माध्यमिक समिती सभापतीपदी ओमी टीमचे रवी जग्यासी, गलिच्छ वस्ती नियोजन समितीच्या सभापतीपदी साई पक्षाचे गजानन शेळके, क्रीडा समितीच्या सभापतीपदी ओमी टीमच्या गीता साधवानी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी ओमी टीमच्या छाया चक्रवर्ती तर महसूल समितीच्या सभापतीपदी साई पक्षाच्या दीप्ती दुधानी निवडून आल्या आहेत. पिठासीन अधिकारी म्हणून मुंबईचे अप्पर जिल्हाधिकारी हिरालाल सोनावणे यांनी काम पाहिले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लागले लक्षमीना आयलानी या राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर चव्हाण, भाजपा, ओमी टीम व साई पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा करून पक्षाला महापालिकेत स्पष्ट बहुमत आहे का? महापौर निवडणुकीत दगाफटका होणार नाही ना? आदीची चाचपाणी घेणार आहेत. त्यांना बहुमताची खात्री झाल्यानंतर ते आयलानी यांना स्वत: महापौर पदाचा राजीनामा आयुक्तांकडे सादर करण्याचा आदेश देणार आहेत.राजीनामा देण्याचा आदेशमहापौरपद ओमी टीमला देण्यासाठी मीना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून आल्याची माहिती कुमार आयलानी यांनी दिली. पक्षाचा आदेश अंतिम असल्याचे आयलानी यांनी सांगितले.अखेर मुख्यमंत्र्यांनीशब्द पाळलाओमी टीमला महापौरपद मिळणार असून मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे ओमी कलानी यांनीसांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या