शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 10:01 IST

कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : महाराष्ट्रात नव्या ‘एचएमपीव्ही’ व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर ठाणे जिल्ह्यात या व्हायरसशी दोन हात करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन सज्ज झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून २० बेड्सचा विशेष कक्ष सज्ज ठेवला आहे. या कक्षात औषध साठ्यासह ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पालिका आयुक्त सौरभ राव यांनी आरोग्य विभागाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील २० बेड्सच्या कक्षात पुरेसा औषधसाठा, डॉक्टरांसह इतर पथके सज्ज आहेत. या आजारात सर्दी, ताप, खोकला येणे अशी लक्षणे आढतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात २० बेडचा कक्ष उभारला आहे. आणखी १०० बेड्सच्या कक्ष उभारणीचे काम सुरू आहे. औषधांसह ऑक्सिजनचा पुरेसा साठाही आहे.

कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड

या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार, २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये या आजाराच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्डही तयार केला आहे.

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलkalwaकळवा