शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलींची छेड काढणाऱ्या तोतया पोलिसाला महिलांनी शिकविला धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 19:13 IST

एका कार्यक्रमाच्या ठिकाणाहून रात्री उशिरा मुंबईतून ठाण्यात परतणा-या तरुणींची छेड काढणा-या प्रकाश कोठावळे या तोतया पोलिसाची रिक्षा चालकाच्या मदतीने धुलाई करुन या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने चांगलीच अद्दल घडविल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे ठाण्यात घडला.

ठळक मुद्दे दुर्गेचा अवतार धारण करीत केली धुलाईआरोपी झाला रुग्णालयात दाखल कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा

ठाणे: कोपरीतील एका २५ वर्षीय तरुणीवर गुरुवारी पहाटे १.३० वा. च्या सुमारास अश्लील शेरेबाजी करीत तिचा विनयभंग करणा-या प्रकाश कोठावळे (३५) याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या या घृणास्पद कृत्याचा मोठया धाडसाने जाब विचारत या तरुणीने आणि तिच्या मैत्रिणीने त्याला दुर्गेचा अवतार दाखवून चांगलाच धडा शिकवला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.एका कार्यक्रमानिमित्त ही तरुणी आपल्या काही मैत्रिणींसह पवई येथील कार्यक्रमासाठी गेली होती. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या दोघीही बुधवारी रात्री उशिरा पवईतून निघाल्या. ठाण्यात येण्यासाठी त्या रिक्षाने मुलूंड चेक नाक्याजवळ उतरल्या. कोपरीमध्ये येण्यासाठी गुरुवारी (३ जानेवारी ) पहाटे १.३० वा. च्या सुमारास दुसरी रिक्षा पकडण्यासाठी ते काही अंतर चालत येत होत्या. त्याचवेळी या तरुणीवर कोठावळे याने अश्लील शेरेबाजी केली. सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतरही त्याने हा प्रकार सुरुच ठेवल्यानंतर तिने धाडस करीत त्याला ‘तुझा काय प्रॉब्लेम आहे?’ असे विचारुन त्याला जाब विचारला. तेंव्हा त्याने उलट तिलाच पकडून तिचा विनयभंग केला. त्यावेळी चवताळलेल्या तिच्या मैत्रिणीने आक्रमक पवित्रा घेतला. दोघींनीही त्याला एका रिक्षा चालकाच्या मदतीने चांगलाच ‘प्रसाद’ दिला. त्यावेळी मात्र पाचावर धारण बसलेल्या कोठावळे याने आपण पोलीस असल्याची बतावणी केली. तरीही त्यांनी आक्रमक पवित्रा सोडला नाही. मग आपण शिवसैनिक असल्याचा त्याने दावा केला. अखेर या मुलीने तिच्या पालकांना हा प्रकार मोबाईलवरुन सांगितला. त्यानंतर त्यालाही काही नागरिकांच्या मदतीने कोपरी पोलिसांच्या स्वाधीन केले. या धुमश्चक्रीत या मुलीच्या मानेलाही त्याने नखाने ओरखडले. त्यांनीही त्याची धुलाई केल्याने तोही यात जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अटक केली जाईल, अशी माहिती कोपरी पोलिसांनी दिली. याप्रकरणी उपनिरीक्षक सुजाता जगताप या अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग