शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

प्लास्टिकबंदीकडे नगरसेवकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 03:58 IST

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनस्थळी मौजमजेसाठी जाण्यास उतावीळ असलेले सत्ताधारी भाजपासह सेनेचे नगरसेवक राज्य शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेकडे फिरकलेदेखील नाहीत.

मीरा रोड : अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनस्थळी मौजमजेसाठी जाण्यास उतावीळ असलेले सत्ताधारी भाजपासह सेनेचे नगरसेवक राज्य शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेकडे फिरकलेदेखील नाहीत. मात्र, काँग्रेसचे ५ नगरसेवक उपस्थित होते.राज्य शासनाने मार्चमध्ये अधिसूचना काढून प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्या अनुषंगाने प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन, विक्री, साठवणूक, आयात, वितरण आणि वाहतुकीस बंदी केली आहे. यात प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या, थर्माकोल आणि प्लास्टिकपासून बनवले जाणारे ताट, कप, चमचे, ग्लास, काटे, वाटी,भांडे, अन्नपदार्थ पॅकिंगसाठीची प्लास्टिक भांडी, स्ट्रॉ, प्लास्टिक पाउचपासून सजावटीसाठी वापरल्या जाणाºया थर्माकोल आणि प्लास्टिक साहित्याचा समावेश आहे.उत्पादन, विक्री, साठा यावर बंदी असून नागरिकांसाठी तीन महिन्यांची म्हणजेच २३ जूनपर्यंत मुदत दिली आहे. या बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने बुधवारी नगरभवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी महापौर डिम्पल मेहता, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या किल्लेदारासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस यांच्यासह संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी आदी उपस्थित होते.नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे अनिल सावंत, मर्लिन डिसा, उमा सपार, सारा अक्रम, राजीव मेहरा उपस्थित होते. परंतु, भाजपा आणि शिवसेनेचा एकही नगरसेवक या महत्त्वाच्या आणि जनजागृतीपर कार्यशाळेकडे फिरकलाच नाही. एरव्ही परदेश दौरे करणारे नगरसेवक गैरहजर राहिल्याने नाराजी पसरली आहे.कार्यशाळेच्या सुरुवातीला पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगवर तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर, शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीची माहिती चित्रफितीद्वारे दिली.डॉ. पानपट्टे यांनी प्लास्टिक-थर्माकोलमुळे लोकांच्या आरोग्याला होणारा धोका, पर्यावरणाचे होणारे नुकसान, प्लास्टिक खाऊन गायी आदी जनावरांचा होणारा मृत्यू आणि नाले तुंबून शहरात होणारी पूरस्थिती आदी माहिती उपस्थितांना दिली. प्लास्टिक-थर्माकोलबंदीमध्ये पहिल्यांदा ५ हजार, दुसºयांदा १० हजार, तर तिसºया वेळी २५ हजार दंड आणि तीन महिने कारावास अशी शिक्षा असल्याचे सांगत पालिका, पोलीस, महसूल विभागाचे कोणीही ही कारवाई करू शकतील, असे ते म्हणाले.>जागृतीसोबतच कारवाईदेखील होणारनागरिक, व्यापारी, हॉटेलचालक अशा कोणाकडेही प्लास्टिक असेल, तर ते महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी अधिकाºयांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. सर्वांनी प्लास्टिक-थर्माकोलचा वापर तातडीने बंद करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासह कारवाईदेखील सुरू करणार असल्याचे डॉ. पानपट्टे म्हणाले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी