शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांनी ओलांडली शंभरी; कोथिंबीर, मटार, फ्लॉवर, कारले, फरसबी, सिमला मिरचीने खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 01:44 IST

कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे.

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून भाज्यांचे दर कडाडले आहेत. भाज्यांनी शंभरी ओलांडल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. रोजच्या जेवणात लागणाऱ्या कोथिंबिरीचे दर गगनाला भिडले आहेत. प्रत्येक भाजीमागे २० ते २५ रुपयांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना भाज्यांच्या वाढत्या दरांमुळे घरांचे बजेटही कोलमडत चालले आहे. पालेभाज्यांचे दरही वाढले असल्याने मोठ्या जुड्यांच्या छोट्या जुड्या करून विकल्या जात आहेत.जनसामान्यांवर कोसळले दुहेरी संकटकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या नोकºया गेल्या. काहींचे पगार कमी झाले, तर काहींना सक्तीच्या बिनपगारी दीर्घ रजा दिल्या आहेत. दुसरीकडे उद्योगधंदेही ठप्प झाल्याने हातमजुरी करणाºया गोरगरिबांसह किरकोळ व्यावसायिकांवरही मोठे संकट कोसळले आहे. अशातच भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्याने जनसामान्यांना दुहेरी फटका सोसावा लागत आहे. या भीषण परिस्थितीत जगावे तरी कसे, असा प्रश्न या सर्वसामान्यांना काही महिन्यांपासून छळत आहे.पावसामुळे झाली कोथिंबीर खराबपावसामुळे कोथिंबीर खराब झाली आहे. त्यामुळे कोथिंबीर महागल्याचे संदीप चौधरी यांनी सांगितले. लॉकडाऊनआधी लावलेल्या भाज्या लॉकडाऊनमध्ये विकल्या, तर लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांनी ५० टक्केच पीक लावल्याने कमी आवक होऊन भाज्यांचे दर वाढले असल्याचे चौधरी यांनी सांगितले.पालेभाज्यांची नावे दरकोथिंबीर (नाशिक) १२० ते १६०शेपू (नाशिक) ५० ते ६०कांदापात (नाशिक) ६० ते ७०पालक १५ ते २०मेथी (नाशिक) ४०(दर प्रति जुडी/रु.)फळभाज्यांची नावे दरमटार २००फ्लॉवर १००कोबी ६०भेंडी ८०दोडका ८०फरसबी १२० ते १४०घेवडा १०० ते १२०वांगी ८०सिमला मिरची ८०गवार १०० ते १२०कारली १०० ते १२०टोमॅटो ६०बटाटे ४०मिरची (लवंगी) १०० ते १२०काकडा मिरची ८०आले (नवीन) ८०आले (जुने) १००(दर रुपये/प्रतिकिलोत)

टॅग्स :vegetableभाज्या