शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांत दिसतो समन्वयाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:23 IST

कार्यालये पडली ओस; युतीच्या बैठका सुरू

उल्हासनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीचे संभाव्य उमेदवार बैठका घेत आहेत. याउलट, दुसरीकडे आघाडीचा उमेदवार जाहीर होऊनही या पक्षांची मध्यवर्ती कार्यालये ओस पडली असून आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वयही नसल्याचे चित्र दिसत आहे.उल्हासनगरात पाच लाखांपेक्षा जास्त मतदार असून उल्हासनगर, कल्याण पूर्व व अंबरनाथ अशा तीन विधानसभा क्षेत्रांत शहर विभागले आहे. शहरातून जास्तीतजास्त मतदान पडण्यासाठी विद्यमान खासदार व शिवसेनेचे संभाव्य उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी गेल्या काही दिवसांपासून शहराकडे लक्ष केंद्रित केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ते शहरात तळ ठोकून होते. भिवंडी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून तिथे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने बंड पुकारले आहे. त्याचा धागा पकडून शहर भाजपाने भिवंडीतील शिवसेनेचे बंड प्रथम मोडून काढा, नंतरच आम्ही प्रचाराला लागू, असे श्रीकांत शिंदे यांना सुनावले होते; मात्र शिंदे यांच्या भेटीगाठीने स्थानिक भाजपा नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा राग निवळला असून शहर जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे यांच्या प्रचाराला लागल्याचे चित्र आहे.शिवसेनेने मराठा सेक्शन व गोलमैदान परिसरात मध्यवर्ती निवडणूक कार्यालय थाटले असून कार्यालय शिवसैनिकांनी बहरून गेले. भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयात निवडणूक विशेष बैठका होत आहेत; मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचे खेमानी-कलानी महल येथील व काँग्रेसचे नेहरू चौकातील मध्यवर्ती कार्यालय ओस पडल्याचे चित्र आहे. काँगे्रसचे शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार पूर्ण ताकदीनिशी करणार असल्याचे सांगितले असून शहरातून सर्वाधिक मतदान राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांना मिळण्याचे संकेत राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्ष आमदार ज्योती कलानी यांनी दिले आहेत.बुथ एजंटची वानवासेना-भाजपा युतीने प्रत्येक बुथ कार्यकर्त्याची बैठक यापूर्वीच घेतली आहे; मात्र त्यातुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी कमी पडत असल्याची चर्चा आहे. आघाडीचीही तयारी सुरू असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार असल्याचे काँगे्रस शहर जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, पदाधिकारी किशोर धडके, कुलदीपसिंग माथारू, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योती कलानी, पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस