पोटनिवडणुकीतही आघाडी - राष्ट्रवादी
By Admin | Updated: March 29, 2016 03:24 IST2016-03-29T03:24:50+5:302016-03-29T03:24:50+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे-वसार आणि भोपर-संदप या दोन प्रभागांत होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही काँग्रेससोबत आघाडी कायम राहील

पोटनिवडणुकीतही आघाडी - राष्ट्रवादी
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे-वसार आणि भोपर-संदप या दोन प्रभागांत होणाऱ्या पोटनिवडणुकांसाठीही काँग्रेससोबत आघाडी कायम राहील, असा दावा राष्ट्रवादीकडून होत असताना काँग्रेसने मात्र मंगळवारी भूमिका मांडू, असे स्पष्ट केले आहे.
केडीएमसीची नोव्हेंबर २०१५ मध्ये पार पडलेली सार्वत्रिक निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून लढली होती. २७ गावांमध्ये मात्र आघाडीने सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला होता. दरम्यान, घोषित झालेल्या पोटनिवडणुकीवर संघर्ष समितीचा बहिष्कार असताना राष्ट्रवादीने मात्र काँग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ११९ माणेरे-वसार या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करणार असून प्रभाग क्रमांक ११४ भोपर-संदप हा काँग्रेसला दिल्याचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी सांगितले. तर काँग्रेसची भूमिका उद्या स्पष्ट होणार आहे.