लेट लतीफांची प्रवेशद्वारावरच हजेरी

By Admin | Updated: February 3, 2015 23:10 IST2015-02-03T23:10:57+5:302015-02-03T23:10:57+5:30

महापालिकेत लेट लतीफ आणि आपल्या मर्जीनुसार केव्हांही हजेरी लावणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सकाळी १०.१५ नंतर मुख्यालयात येणाऱ्यांवर लेट मार्क लावला जाणार आहे.

Late Lateef's entry to the entrance | लेट लतीफांची प्रवेशद्वारावरच हजेरी

लेट लतीफांची प्रवेशद्वारावरच हजेरी

अजित मांडके - ठाणे
महापालिकेत लेट लतीफ आणि आपल्या मर्जीनुसार केव्हांही हजेरी लावणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. सकाळी १०.१५ नंतर मुख्यालयात येणाऱ्यांवर लेट मार्क लावला जाणार आहे. अंमलबजावणीच्या पहिल्याच (मंगळवारी) दिवशी सुमारे २० अधिकाऱ्यांनी उशिराने हजेरी लावल्याची बाब समोर आली आहे.
पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना शिस्त लागावी, त्यांनी वेळेत काम करावे, प्रलंबित प्रकरणे तत्काळ मार्गी लावावी आणि तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरीकांना वेळ देऊन त्यांच्या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी, यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता कर्मचाऱ्यांनी त्यातही खासकरुन अधिकाऱ्यांनी वेळेवर कामावर यावे यासाठी त्यांना सकाळी १०.१५ वेळ ही निश्चित करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच अडविले जात असून, त्यांच्याकडून त्यांचे आणि विभागाचे नाव तसेच किती वाजता आले, ती वेळ रजिस्टरमध्ये नोंद केली जात आहे. त्यानुसार मंगळवारी पहिल्याच दिवशी सुमारे २० हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचा लेट मार्क लागला असून, यामध्ये शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांचा अधिक भरणा असल्याची माहिती सुत्रांनी दिली. प्रत्येक दिवसाचे रजिस्टर आयुक्तांच्या हाती पडत असल्याने त्यानुसार संबधींत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करणे सोपे जाणार आहे.

४पालिकेत आजच्या घडीला ८६२५ कर्मचारी- अधिकारी असून मुख्यालयात १८२६ कर्मचारी - अधिकारी कार्यरत आहे.
४पालिका मुख्यालयाला चार गेट असले तरी त्यातील तीन गेट सुरु असून पहिल्या दिवशी मुख्य गेटवर चौकशी केली जात होती. परंतु उर्वरित दोन गेटवर चौकशी न केली गेल्याने काहींनी त्यांचा वापर करुन आपला विभाग गाठला.
४प्रत्येक विभागात काम करणारा अधिकारी जर १० तास काम करीत असेल, तर मी १२ तास काम करेन असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
४मुख्यालयात यापूर्वी रजिस्टरद्वारे, त्यानंतर थम्प इंम्प्ररेशन आणि नंतर फेसरिडींगद्वारे पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली जात होती. परंतु आता पालिका आयुक्तांनी सुरु केलेल्या नव्या हजेरीमुळे आता कोट्यवधी रुपये खर्चून लावलेल्या मशिन आता नाममात्र ठरणार आहेत.
४सलग तीन दिवस उशिराने येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्याची एक सीएल कमी होणार असून यापुढे जाऊन त्याच्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

Web Title: Late Lateef's entry to the entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.