‘मासुंदा’वर साकारणार लेझर शो

By Admin | Updated: November 16, 2016 04:23 IST2016-11-16T04:23:00+5:302016-11-16T04:23:00+5:30

ठाणेकरांची चौपाटी म्हणून ओळख असलेला मासुंदा तलाव आता कात टाकणार असून त्यात आता ठाणे महापालिका प्रथमच लेझर शो

Laser Show to Act on Masooda | ‘मासुंदा’वर साकारणार लेझर शो

‘मासुंदा’वर साकारणार लेझर शो

ठाणे : ठाणेकरांची चौपाटी म्हणून ओळख असलेला मासुंदा तलाव आता कात टाकणार असून त्यात आता ठाणे महापालिका प्रथमच लेझर शो सुरु करणार असून संगीताच्या तालाववर कारंजे हवेत उडणार आहे. या ठिकाणी एक अ‍ॅम्पी थिएटरदेखील उभारणार असल्याने ही चौपाटी आता खऱ्या अर्थाने वेगळ्या लुकमध्ये ठाणेकरांना अनुभवास मिळणार आहे.
मागील काही वर्षापूर्वी या तलावाचा लुक बदलण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यासाठी सुमारे ४ कोटींच्या आसपास खर्च देखील केला होता. परंतु तो करुनही त्यात फारसा काही फरक पडलेला नाही.
खासदार राजन विचारे हे ज्यावेळेस महापौर होते, तेव्हा त्यांनी मासुंदा तलावात लेझर शोची संकल्पना पुढे आणली. पण गती मिळाली नव्हती. ६० बाय ३० मीटरच्या आकारात हा लेझर शो आकार घेणार असूून याची उंची १६ मीटर असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Laser Show to Act on Masooda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.