शालेय पोषण आहारात अळ्या

By Admin | Updated: June 24, 2016 03:41 IST2016-06-24T03:41:03+5:302016-06-24T03:41:03+5:30

शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्ह भोजनात गुरूवारी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भातामध्ये

Larvae in school nutrition | शालेय पोषण आहारात अळ्या

शालेय पोषण आहारात अळ्या

अंबरनाथ : शालेय पोषण आहार योजनेतून विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या माध्यान्ह भोजनात गुरूवारी नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भातामध्ये अळ््या सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शाळेला भेट दिली असून भाताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
अंबरनाथ नगरपालिकेच्या खुंटवली येथील बहुभाषिक शाळेत यावर्षी शाळा सुरू झाल्यापासून दररोज माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारी आहार दिला जातो. गुरूवारी या शाळेतील विद्यार्थ्यांना भात आणि आमटी देण्यात येणार होती. यासाठी शाळेमध्ये भाताचे डबे आणले गेले. मात्र भातामध्ये अळया असल्याचे शाळेतील काही शिक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब अन्य शिक्षकांच्या निदर्शनास आणून दिली. तेलगू माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांना भात न देता तो टाकून दिला आणि अळया असलेल्या भाताचा नमुना ठेवला. पालिका प्रशासन आणि शिक्षणाधिकारी यांच्या कानावर हा प्रकार घातला. तसेच ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनकडे याबाबत तक्र ार केली असता अ. ज. विरकैदें यांनी बहुभाषिक शाळेला भेट दिली. भातात अळ्या असल्याचे त्यांनी मान्य केले.

Web Title: Larvae in school nutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.