कल्याणमध्ये पाण्यात सापडल्या अळ्या
By Admin | Updated: February 22, 2017 06:28 IST2017-02-22T06:28:05+5:302017-02-22T06:28:05+5:30
पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील साई श्रद्धा सोसायटी आणि परिसरात नळाच्या पाण्यातून

कल्याणमध्ये पाण्यात सापडल्या अळ्या
कल्याण : पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील साई श्रद्धा सोसायटी आणि परिसरात नळाच्या पाण्यातून अळ्या येत असल्याने स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला.
काही दिवसांपासून सोसायटीच्या बाजूच्या परिसरात नळाचे पाणी गढूळ येत असल्याच्या तक्र ारी होत्या. यामुळे नागरिक नळाला जाळी लावून पिण्याचे पाणी भरत होते. जाळी न लावता पाणी भरले असता पाण्यात अळ्या असल्याचे शारदा कुरील यांच्या निदर्शनास आले. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)