घरफोडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:32+5:302021-04-03T04:36:32+5:30

-------------- लोखंडी हातोड्याने प्रहार डोंबिवली : भांडणाचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्रहार करून तिला ...

Lampas worth Rs 15 lakh in burglary | घरफोडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

घरफोडीत सव्वा लाखांचा मुद्देमाल लंपास

--------------

लोखंडी हातोड्याने प्रहार

डोंबिवली : भांडणाचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने प्रहार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेकडील लक्ष्मी निवास येथे घडली. याप्रकरणी पत्नी काजल हिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून पती राज अग्रवाल ऊर्फ गुप्ता याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी ४.२० वाजता घडली.

------------------------------------------------

मोबाइल लंपास

डोंबिवली : पश्चिमेकडील कोपरगाव परिसरातील मैत्री पार्क बिल्डिंगमध्ये राहणारी ऐश्वर्या कुळ्ये ही तरुणी गुरुवारी सकाळी १० वाजता एम.जी. रोडने जात असताना तिच्या बॅगेतील मोबाइल चोरट्याने लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------

दुचाकी चोरी

कल्याण : फैजल शेख यांनी त्यांची दुचाकी २५ मार्चला भानूसागर टॉकिजच्या परिसरात पार्क केली होती. तेथून ती गाडी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीला गेली. याप्रकरणी शेख यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

-----------------------

बतावणी करून दागिने लंपास

कल्याण : पूर्वेकडील विजयनगर परिसरात राहणा-या सुवर्णा जाधव या बुधवारी दुपारी १२.३० वाजता घरी जात होत्या. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि दोघांनी मोफत तांदूळ मिळतात, असा बहाणा करून त्यांना अंगावरील दागिने काढून पाकिटात ठेवण्यास सांगितले. यावेळी बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील दागिने काढलेले पाकीट दोघांनी लंपास केले. आपण लुबाडलो गेल्याचे समजताच त्यांनी थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

-----------------------------------------------------

मोबाइल आणि रोकड लंपास

डोंबिवली : पूर्वेकडील कचोरेगाव परिसरातील न्यू गोविंदवाडी परिसरात राहणारे राजिक शब्बीर शेख यांच्या बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघड्या राहिलेल्या दरवाजावाटे आत घुसून चोरट्यांनी दोन मोबाइल फोन आणि रोकड असा २० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

------------------------------------------------------

पुनर्वसन उपक्रमाला प्रारंभ

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कुष्ठरुग्ण कुटुंबातील महिलांनी सक्षम होण्यासाठी पुढाकार घेत १८ महिलांना शिलाई मशीन भेट दिल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारपासून ख-या अर्थाने उपक्रमाला सुरुवात झाली. कुष्ठमित्र गजानन माने आणि हनुमाननगर कुष्ठरुग्ण सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी उल्हासनगरमधील व्यापा-यांशी चर्चा केली. यात महिलांना एक हजार पिशव्या शिवण्याचे काम मिळाले आहे. यामुळे महिलांचे मनोबल वाढणार असून पुनर्वसनाचे काम यापुढेही प्रगतीपथावर सुरू राहील, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.

------------------------------------------------------

Web Title: Lampas worth Rs 15 lakh in burglary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.