शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

उत्तन वासियांच्या मदतीला पुन्हा धावून आली लालपरी; एसटीनेच प्रवास करण्याचं आवाहन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:16 IST

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या नाकर्तेपणा मुळे महापालिकेची परिवहन सेवा ठेकेदाराला कडून सतत बंदच असल्याने उत्तन वासियांचे प्रचंड हाल होत आहेत. अखेर येथील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एसटी महामंडळाची लालपरी धावून आली आहे . आज रविवार पासून भाईंदर - उत्तन अशी बससेवा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे . जुनं ते सोनं असे म्हणत उत्तन वासियांनी या पुढे पालिका बस ने नाही  तर एसटीने प्रवास करणार असा निर्धार बोलून दाखवला . 

कोरोनाच्या संक्रमण काळात पालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा चालवली जात होती . परंतु ठेकेदाराला पैसे दिले जात नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार नाही म्हणून भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने अचानक बंद केला होता. त्या नंतर नागरिकांसाठी सुरु झालेली उत्तन मार्गावरील बससेवा ८ सप्टेंबर रोजी भाजपा प्रणित संघटनेने पुन्हा बंद पाडली . या आधी देखील अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरण्याचे प्रकार झाले . ठेकेदाराने बस सेवा दिली नाही तर राष्ट्रीय कामगार व श्रमजीवी या दुसऱ्या संघटनांचे कर्मचारी बस चालवण्यास तयार असताना पालिकेने नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली . 

बस सेवा बंद पडल्याने मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चौक भागातील नागरिकांचे सर्वात जास्त हाल होत होते . त्यांना नाईलाजाने ५० ते ६० रुपये एकावेळचे रिक्षाभाडे देऊन भाईंदरला यावे लागायचे . जायला सुद्धा तेवढेच भाडे वसूल केले जायचे . त्यामुळे येथील नागरिकांनी स्थानिक शिवसेना नगरसेवक तसेच आमदार प्रताप सरनाईक ह्यांना बस सेवा मिळवून देण्याची मागणी केली होती . 

आ .सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना फोन करून परिवहन ठेकेदार, भाजपा प्रणित संघटने मुळे नागरिकांचे चाललेले हाल सांगितले व एसटी बस सुरु करण्याची विनंती केली .  परिवहनमंत्री परब ह्यांनी भाईंदर - उत्तन मार्गावर एसटी बससेवा सुरु करण्याचे मान्य करत तसे आदेश अधिकाऱ्यांना दिले . त्या अनुषंगाने आज रविवार पासून उत्तन साठी एसटी बस सेवा सुरु झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

एसटी बसचे येथील नागरिकांसह प्रवासी संघटनेने स्वागत केले आहे . पूर्वी या भागात एसटी बसचीच सेवा चालायची . परंतु पालिकेची बस आल्याने एसटी बंद केली गेली . मात्र पालिकेच्या बससेवेचा नेहमीचा आडमुठेपणा पाहता नागरिक संतप्त आहेत . त्यांनी तर एमबीएमटी चे फुलफॉर्मच  मेरे भरोसे मत ठेहरो असे करून टाकले आहे . या आधी देखील पालिका बस संपा मुळे बंद पाडली असता  विचारे ह्यांनी एसटी बस सुरु करून दिली होती . आता मात्र पालिकेच्या नव्हे तर एसटी बसनेच प्रवास करा , जुनं ते सोनं असे आवाहन प्रवासी व अन्य संघटना आदीं कडून नागरिकांना केले गेले आहे .

टॅग्स :state transportएसटीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस