लखलखते दिवे, नक्षीदार तबक

By Admin | Updated: September 3, 2016 02:40 IST2016-09-03T02:40:55+5:302016-09-03T02:40:55+5:30

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. चांदीचे, काचेचे, चिनी मातीचे आकर्षक-लखलखते दिवे, आरतीसाठी

Lakhhkhate Diwas, Nakshidar Tabak | लखलखते दिवे, नक्षीदार तबक

लखलखते दिवे, नक्षीदार तबक

- स्नेहा पावसकर, ठाणे
गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी पुजा साहित्याच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. चांदीचे, काचेचे, चिनी मातीचे आकर्षक-लखलखते दिवे, आरतीसाठी-पुजेसाठी नक्षीदार तबक, विविध डिझाइनच्या चौरंगांनी बाजारपेठा सजल्या आहेत.
समया, पाट, फुलदाण्या, उदबत्तीची घरे, चंदनाची उटी लावण्यासाठी तबक, धुपारती-कर्पूर आरतीसाठी पात्र अशा नाना प्रकारच्या पूजा साहित्याने दुकाने खचाखच भरली आहेत.
विविध आकाराचे डायमंड जडवलेला दिवा हा यंदा सुरेख पर्याय आहे. कमीतकमी २५० पासून ते ६५० रूपये किमतीत हे डायमंड दिवे उपलब्ध आहेत. रेखीव नक्षीकाम केलेले काचेचे दिवेही लक्ष वेधून घेत आहेत. मोर, देवीचा मुखवटा, कमळाच्या फुलाची नक्षी असलेल्या छोट्या समईपासून ते अगदी ५-६ फुटांपर्यंतच्या समया विक्रीसाठी आहेत. यातही व्हाईट मेटल समया ३०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.
बाप्पाची आरतीसाठी पंचपाळे, निरांजन, तबक अशी सामग्रीही नव्या ढंगात उपलब्ध आहे. रेडीमेड आरतीचे ताट १५०-२०० रूपयात उपलब्ध आहे. यातही डिझाइन करून सजविलेले कलर ताट किंवा सिल्व्हर ताट २५० ते ४५० रूपयांना मिळते. काही दुकानांमध्ये काचेचे आकर्षक नक्षीकाम केलेले आरतीचे ताटही उपलब्ध आहे. त्याची किंमत ५० रूपयांपासून पुढे आहे. होमहवनासाठी लागणारे होमकुंडही वेगवेगळ््या आकारात उपलब्ध आहे.आरतीसाठी लागणारे टाळ ७० ते २०० रूपयांच्या घरात आहेत.

प्रतिष्ठापनेवेळी लागणारे पाट, तसेच पूजा मांडण्यासाठी लागणारे विविध आकारातील नक्षीदार चौरंगही २०० रूपयांपासून पुढे उपलब्ध आहेत. चौरंगामध्येही सिल्व्हर रंग दिलेला लाकडी चौरंग आकर्षक आहेत.

Web Title: Lakhhkhate Diwas, Nakshidar Tabak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.