स्वीकृत सदस्यांची संख्या वाढण्याची लोणकढी थाप
By Admin | Updated: March 25, 2017 01:24 IST2017-03-25T01:24:01+5:302017-03-25T01:24:01+5:30
ठामपामधील स्वीकृत सदस्यपदांकडे डोळे लावून बसलेल्या पराभूत, माजी नगरसेवकांना सध्या या पदांची संख्या पाचवरून वाढून

स्वीकृत सदस्यांची संख्या वाढण्याची लोणकढी थाप
ठाणे : ठामपामधील स्वीकृत सदस्यपदांकडे डोळे लावून बसलेल्या पराभूत, माजी नगरसेवकांना सध्या या पदांची संख्या पाचवरून वाढून १० केली जाणार असल्याचे गाजर दाखवले जात आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा ‘स्वीकृतचा गाजरहलवा’ मुखात पडेल, या आशेवर असलेल्यांचा भ्रमनिरास होणार आहे. कारण, असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे नगरविकास विभागाच्या उच्चपदस्थांनी स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेत शिवसेनेने प्रथमच एकहाती सत्ता संपादित केली आहे. त्यांना ६७ जागांवर यश मिळाले आहे. परंतु, स्थायीची गणिते जुळवण्यासाठी त्यांना काँग्रेसचा ‘हात’ हाती घ्यावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसला स्थायीबरोबर स्वीकृतची लॉटरी लागणार असल्याची चर्चा आहे. स्वीकृत सदस्यांची निवड केव्हा होणार, अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, स्वीकृत सदस्यांमध्ये काँग्रेसला वाटेकरी करून घेण्याच्या निर्णयामुळे सेनेतील पराभूत व माजी नगरसेवक नाराज आहेत. (प्रतिनिधी)