Kyle's uncle murdered on suspicion of witchcraft | जादूटोण्याच्या संशयातून केली काकाची हत्या
जादूटोण्याच्या संशयातून केली काकाची हत्या

मुंब्रा : तीन वर्षांपूर्वी काकाने केलेल्या जादूटोण्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याच्या संशयाने पछाडलेल्या पुतण्याने मित्रांच्या साहाय्याने काकाची हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्याने काकाचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले होते. दोन दिवसांपूर्वी दहिसर मोरी भागातील ठाकूरपाडा येथील डोंगराळ भागात शिरविरहित शव आढळले होते.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपी पुतण्या आणि त्याच्या मित्राला २४ तासांमध्ये अटक केली. आरोपीने ज्याची हत्या करण्यात आली, त्याचे नाव विष्णू नागरे असल्याचे उघड झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४ जवळील पिंपरी गावात ते राहत होते. त्यांचा भाऊ कृष्णा यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांचा मृत्यू विष्णू यांनी केलेल्या जादूटोण्यामुळे झाल्याचा संशय कृष्णा याचा मुलगा अमित नागरे याला होता. यातूनच त्याने विष्णू नागरे यांना मद्यप्राशन करण्याच्या निमित्ताने ठाकूरपाडा परिसरातील एका दगडखाणीमागे नेले. तिथे अमितने त्यांची हत्या केल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी अमित आणि त्याचा मित्र अमर शर्मा याला अटक केली असून, दिवा डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकलेले शिर ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात सामील असलेल्या इतर तिघांचा शोध सुरु आहे. विष्णू यांच्या पत्नीने पती हरवल्याची तक्रार शीळ-डायघर पोलिसांना दिली होती. त्यानंतर तपासाला वेग येऊन, २४ तासांत या प्रकरणाची उकल झाली.

Web Title: Kyle's uncle murdered on suspicion of witchcraft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.