कुजबुज सदर - हे जीवन म्हणजे क्रिकएट राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:43 IST2021-09-18T04:43:01+5:302021-09-18T04:43:01+5:30
............. आभासी भेट घे रे अध्यक्षा मुंबई पोर्ट ट्रस्टचा पसारा मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्या अनेकांना जाणवत नाही. मुंबई महापालिका ...

कुजबुज सदर - हे जीवन म्हणजे क्रिकएट राजा
.............
आभासी भेट घे रे अध्यक्षा
मुंबई पोर्ट ट्रस्टचा पसारा मुंबईत वर्षानुवर्षे वास्तव्य करणाऱ्या अनेकांना जाणवत नाही. मुंबई महापालिका आयुक्त पदावरून दूर केल्यानंतर जर मंत्रालयात मुख्य सचिवांची खुर्ची रिकामी नसेल किंवा लागलीच रिकामी होणारी नसेल तर मातब्बर सनदी अधिकारी मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद मिळवून आपले ‘मी मुंबईकर’ हे अस्तित्व टिकवतात. सध्या राजीव जलोटा हे पोर्ट
ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. अध्यक्षांच्या केबिनला लागून बोर्ड रूम आहे. कामगारांच्या वेतनवाढीवर तोडगा काढण्यासाठी जलोटा यांनी विश्वस्त मंडळाची बैठक बोलावली होती. बरं पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्तांची संख्या डझनभर नाही. केवळ दोन विश्वस्त असून ते बोर्ड रूममध्ये दाखल झाले. अध्यक्ष आता येतील, मग येतील या प्रतीक्षेत असलेल्या विश्वस्तांसोबत शेजारच्या केबिनमध्ये बसलेल्या अध्यक्षांनी स्क्रीनवर आभासी पद्धतीने प्रकट होऊन बैठक घेतली तेव्हा धक्का बसला. बैठक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत असल्याने या आभासी भेटीची कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली.
...............