शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड यांच्या मतदारसंघातील कोविड सेंटर अखेर होणार बंद, म्हाडाने मागितले २.६६ कोटींचे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 07:31 IST

Thane : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती.

ठाणे : म्हाडाने गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा आणि मुंब्रा या मतदारसंघात उभारलेले कोविड सेंटर अवघ्या तीनच महिन्यांत बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. म्हाडाने येथे केवळ रुग्णालय उभारले असून, त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ, साहित्य, जेवण, मेडिसिन, ऑक्सिजन आदींसह इतर पुरवठा ठाणे महापालिका आपल्या खर्चातून करीत आहे. असे असताना तीन महिन्यांनंतर या दोन्ही रुग्णालयांचे दोन कोटी ६६ लाखांचे भाडे म्हाडाने मागितल्याने हे कोविड सेंटरच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कळवा आणि मुंब्य्रातील रुग्णांनाही ठाण्यात धाव घ्यावी लागत होती. त्यामुळे कळव्यात आणि मुंब्य्रातही म्हाडाने तीन महिन्यांपूर्वी ही रुग्णालये उभारली होती. म्हाडाच्याच जागेवर ती होती. त्यानुसार, कळवा येथे ४०० आणि मुंब्रा येथे ४१० असे एकूण ८१० बेड या दोन्ही रुग्णालयांमध्ये होते. याची निगा देखभाल, या ठिकाणी लागणारे डॉक्टरांसकट इतर मनुष्यबळ महापालिकेने पुरविले होते, तसेच त्यांचा खर्चही महापालिका करीत आहे.दरम्यान, शुक्रवारी झालेल्या महासभेत या रुग्णालयांच्या ठिकाणी लिक्विड मेडिकल ऑक्सिजन पुरविणे आणि हाउसकीपिंग पुरविणे असे दोन प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आले  होते. त्यावर चर्चा करताना एवढा सगळा खर्च महापालिका करीत असताना, आता पुन्हा म्हाडाने जे काही स्ट्रक्चरल उभे केले आहे, त्याचे भाडे मागितले आहे, ते का द्यावे, असा सवाल या वेळी माजी सभापती राम रेपाळे यांनी केला. 

मंत्र्यांच्या भूमिकेकडे लागले लक्षसध्या महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ही रुग्णालयेच बंद करावीत, असा ठराव त्यांनी मांडला त्याला अनुमोदन देण्यात आले. महापौरांनीही महापालिकेने भाडे देण्यास आक्षेप घेऊन ती बंद करावीत, असे आदेश प्रशासनाला दिले. आता आव्हाड या बाबत काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे