कोपर उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील सात गर्डर बसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:36 IST2021-04-03T04:36:47+5:302021-04-03T04:36:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कोपर उड्डाणपुलाच्या फेरउभारणीकरिता आवश्यक असलेल्या २१ पैकी दुसऱ्या टप्प्यातील सात गर्डर शुक्रवारी चढवण्यात आले. ...

Kopar installed seven girders in the second phase of the flyover | कोपर उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील सात गर्डर बसवले

कोपर उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील सात गर्डर बसवले

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कोपर उड्डाणपुलाच्या फेरउभारणीकरिता आवश्यक असलेल्या २१ पैकी दुसऱ्या टप्प्यातील सात गर्डर शुक्रवारी चढवण्यात आले. प्रत्येकी सहा टन वजनाचे आतापर्यंत १४ गर्डर बसवण्यात आले आहेत. आता तिसऱ्या टप्प्यातील गर्डर बसवल्यावर पुलाच्या उभारणीचे बहुतांश काम पूर्ण होईल.

गेल्या आठवड्यात पहिल्या टप्प्यात आमदार रवींद्र चव्हाण, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत गर्डर बसवण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्यात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गर्डर चढवण्यात आले. आगामी आठवड्यात अन्य गर्डर बसवून त्यानंतर प्लास्टर व अन्य तांत्रिक कामे करण्यात येतील, असे प्रकल्प अभियंता तरुण जुनेजा यांनी स्पष्ट केले.

काम योग्य पद्धतीने सुरू असून मे महिन्यापर्यंत पूर्ण होईल आणि नागरिकांसाठी कोपर पूल खुला केला जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केला. कामाचा दर्जा राखणे आणि वेग सांभाळणे याबाबतच्या सूचना शिंदे यांनी दिल्या. दरम्यान, पुलाच्या कामादरम्यान बाधित होणाऱ्या वास्तूंची पाहणी शिंदे यांनी केली. नागरिकांची घरे उद्‌ध्वस्त होऊन संसार उघड्यावर येणार नाहीत, याची काळजी घेऊन काम पूर्ण केले जाईल, असे ते म्हणाले.

त्यांच्यासमवेत शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, दीपेश म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

* उड्डाणपुलाचे गर्डर उचलण्याचे काम दुपारनंतर पाच वाजण्याच्या सुमारास झाले. संध्याकाळी उशिरापर्यंत त्या ठिकणी नटबोल्ड लावण्याचे काम कामगारांनी केले.

----------

फोटो आहे

..........

वाचली

Web Title: Kopar installed seven girders in the second phase of the flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.