पूर्वेतील खाडी किनारालगतच्या परिसराला चेंदणी काेळीवाडा बंदर नाव देण्याची कोळी बांधवांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST2021-02-22T04:30:12+5:302021-02-22T04:30:12+5:30
ठाणे : ठाणे पूर्वेतील मीठबंदर राेड येथील कस्टम जेट्टीला चेंदणी काेळीवाडा बंदर म्हणून ओळखले जाते. या परिसराला गणेश विसर्जन ...

पूर्वेतील खाडी किनारालगतच्या परिसराला चेंदणी काेळीवाडा बंदर नाव देण्याची कोळी बांधवांची मागणी
ठाणे : ठाणे पूर्वेतील मीठबंदर राेड येथील कस्टम जेट्टीला चेंदणी काेळीवाडा बंदर म्हणून ओळखले जाते. या परिसराला गणेश विसर्जन घाट म्हणूनही अलीकडे नाव मिळाले आहे. चेंदणी काेळीवाडा बंदराला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पूर्वी काेळीवाड्यातील स्थानिक काेळी बांधवांचे वास्तव्य व उपजीविकेचे प्रमुख साधन असलेल्या या बंदराला पुन्हा चेंदणी काेळीवाडा बंदर हे नाव देण्याची मागणी स्थानिक काेळी संघटना व काेळी बांधवांनी केली आहे.
या मागणीचे कोळी बांधवांनी प्रवेशद्वाराला चेंदणी काेळीवाडा काेळी जमात ट्रस्ट, ठाणेतर्फे चेंदणी काेळीवाडा बंदर व त्याची माहिती असलेले बॅनर लावले असून ते सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सुशाेभीकरणाचे काम सध्या याठिकाणी चालू आहे. त्यानिमित्ताने चेंदणी काेळीवाडा बंदर हे नाव पुन्हा मिळण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरांना जोडणारी जलवाहतूक सुरू होऊ घातली आहे. अशावेळी चेंदणी कोळीवाड्याच्या बंदरातून होणाऱ्या जलवाहतुकीचा इतिहास लक्षात ठेेवणे आवश्यक आहे, असे कोळी बांधवांचे मत आहे.
चेंदणी हे कोळी लोकांची वस्ती असलेले गाव सोळाव्या शतकापूर्वीपासून जागतिक जलवाहतुकीचे प्रमुख बंदर होते. अरब म्हणजे आखाती देशांतून मालाची आयात-निर्यात भारतात होत असे. त्यावेळी ठाण्यातील चेंदणी कोळीवाडा हे प्रमुख बंदर होते. ही व इतर माहिती या बॅनरवर देण्यात आली आहे. प्रशासनाला या नावाचे स्मरण व्हावे आणि चेंदणी काेळीवाडा बंदर हे नाव पुन्हा या खाडीलगतच्;ा परिसराला मिळावे, अशी समस्त कोळी बांधवांची मागणी असल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.