थुंकल्याच्या कारणावरून तरुणावर चाकू वार
By Admin | Updated: September 26, 2015 00:51 IST2015-09-26T00:51:29+5:302015-09-26T00:51:29+5:30
कचराकुंडीजवळ थुंकण्याच्या कारणावरून वागळे इस्टेट परिसरातील ३६ वर्षीय झसमावर एका चौकडीने चाकूने सपासप वार केल्याची घटना पडवळनगर येथे घडली

थुंकल्याच्या कारणावरून तरुणावर चाकू वार
ठाणे : कचराकुंडीजवळ थुंकण्याच्या कारणावरून वागळे इस्टेट परिसरातील ३६ वर्षीय झसमावर एका चौकडीने चाकूने सपासप वार केल्याची घटना पडवळनगर येथे घडली. याप्रकरणी हरिष जुवाटकर, उमेश जुवाटकर, सागर शेड्डी आणि त्याच्या मित्र अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फिर्यादीस थुंकल्याच्या कारणाचा बहाणा करून जुन्या भांडणाचा राग मनात धरून उमेशने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. तसेच तिघांनी लाकडी बांबू, स्टम्पने मारहाण केली. याप्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. डी.कोळी करीत आहेत. (प्रतिनिधी)