शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात नळावर झालेल्या पुरुषांच्या भांडणातून एकावर दुस-याने केला चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 20:40 IST

ठाण्याच्या बाळकूम भागात नळावर झालेल्या भांडणातून एका पुरुषाने दुस-याच्या डोक्यात चाकूने वार केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या प्रकाराने परिसरातील रहिवाशांसह पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देचाकू हल्ल्यानंतर हल्लेखोर पसारपोलिसांकडून शोध सरुचबाळकूम दादलानी भागातील प्रकार

ठाणे : पाणी भरण्याच्या वादातून एरव्ही, महिलांमध्ये कडाक्याची भांडणे झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. ठाण्याच्या बाळकूम भागात मात्र दोन पुरुषांमध्ये चांगलीच जुंपली. यातून सागर शिल्पकार (२२) या तरुणावर रविवारी रात्री चाकूचे वार करून सुरेश नामक व्यक्ती पसार झाला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.ठाण्याच्या बाळकूम दादलानी पार्क बेकरी समोरील रोडवर असलेल्या नळावर रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सागर हा पाणी भरत होते. त्याचवेळी तिथे आलेल्या सुरेशने ‘पाणी भरता है क्या, नल तुम्हारे बाप का है क्या,’ असे म्हणून त्याला शिवीगाळ केली. त्यावर शिवीगाळ केल्याचा जाब सागरने त्याला विचारला. याचाच राग आल्याने सुरेशने सागरच्या डोक्यावर चाकूने वार केला. दुसºयांदाही त्याने पुन्हा सागरच्या डोक्यावर चाकूने वार करण्याचा त्याने प्रयत्न केला असता, तो त्याने चुकविला. मात्र, त्याच्या गळयावर दोन ठिकाणी वार करुन त्याला जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या सागरला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सुरेशविरुद्ध सोमवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपनिरीक्षक एच. एस. चिरमाडे हे अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसcrimeगुन्हे