पैशाच्या देवाणघेवाणीतून चाकूने हल्ला, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:27 IST2021-06-24T04:27:01+5:302021-06-24T04:27:01+5:30

ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवासी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खुनी ...

Knife attack in exchange of money, two arrested | पैशाच्या देवाणघेवाणीतून चाकूने हल्ला, दोघांना अटक

पैशाच्या देवाणघेवाणीतून चाकूने हल्ला, दोघांना अटक

ठाणे : ठाण्यातील राबोडी परिसरातील रहिवासी दिनेश पांचाळ (३२, रा. आनंद पार्क, ठाणे) यांच्यावर लोखंडी रॉड आणि चॉपरने खुनी हल्ला करणाऱ्या इतेश धेंडे (२३, रा. वारली पाडा, श्रीनगर, ठाणे) आणि हितेश औसारे (२१, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना राबोडी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आनंद पार्क परिसरात वास्तव्याला असलेल्या दिनेश याच्या डोक्यावर आणि डाव्या हातावर इतेश आणि हितेश या दोघांनी लोखंडी रॉड आणि चॉपरने २३ जून रोजी पहाटे वार केले. या हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात दिनेश यांचे मित्र पराग परब यांनी गुन्हा दाखल केला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक पी. बी. भालेराव, सहायक पोलीस निरीक्षक एम. ए. कांबळे आणि उपनिरीक्षक महेश जाधव यांच्या पथकाने इतेश आणि हितेश या दोघांनाही राबोडी परिसरातून बुधवारी दुपारी अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक बी. एस. चव्हाण हे करीत आहेत.

Web Title: Knife attack in exchange of money, two arrested