शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बाईकवर बसवून नेला मृतदेह, ठाण्यात मित्राने केली मित्राची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 18:48 IST

अन्य कुठल्याही नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. कारण मैत्रीच्या नात्यात आपण स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करतो.

ठळक मुद्देगोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत या दोघांनी मयुर डोळसे या आपल्या मित्राला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले.मुयरच्या मृतदेहाला दोघांच्यामध्ये अशा पद्धतीने बसवले कि, पाहणा-याला कुठलाही संशय येणार नाही.

कल्याण - अन्य कुठल्याही नात्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जास्त प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असते. कारण मैत्रीच्या नात्यात आपण स्वत:ला मुक्तपणे व्यक्त करतो. जे आपण कुटुंबियांजवळ बोलत नाही त्या गोष्टी आपण मित्राला सांगतो. पण काही वेळा आयुष्यात असे मित्र भेटतात कि, शत्रूची गरजच पडत नाही. अंबरनाथ वडवलीमध्ये रहाणा-या दोन युवकांनी अशाच प्रकारे फसवून आपल्या मित्राची हत्या केली. 

गोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत या दोघांनी मयुर डोळसे या आपल्या मित्राला रात्रीच्या जेवणासाठी बोलावले. गोकुळ आणि प्रमोदने जेवणामधून झोपेच्या गोळया देऊन मयुरला बेशुद्ध केले व त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर दोघांनी मयुरचा मृतदेह बाईकवर ठेवला. त्यांनी मुयरच्या मृतदेहाला दोघांच्यामध्ये अशा पद्धतीने बसवले कि, पाहणा-याला कुठलाही संशय येणार नाही. तिघेजण बाईकवरुन चालले आहेत असे पाहणा-याला वाटावे. रात्रीच्यावेळी त्यांनी जवळपास सहा किलोमीटरपर्यंत बाईक चालवली व गर्द झाडीत मृतदेह फेकून दिला. 

त्यांनी मयुरची कुटुंबाकडून 25 लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्लान केला होता. मयुरची हत्या केल्यानंतर दोघेही घाबरले व खंडणी उकळण्याचा प्लान त्यांनी रद्द केला. 11 नोव्हेंबरला मयुरच्या कुटुंबियांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. 10 नोव्हेंबरला खडकपाडा पोलिसांना  वडवली गावात झुडूपांमध्ये एक मृतदेह सापडला होता. पोलीस स्टेशनमधल्या समन्वयामुळे दुस-याच दिवशी 11 नोव्हेंबरला तो मृतदेह मयुरचाच असल्याचे कोळसेवाडी पोलिसांनी स्पष्ट केले. 

पोलिसांनी मयुरच्या मोबाईल कॉल्सचे डिटेल्स तपासल्यानंतर त्याचे शेवटचे बोलणे एका मुलीबरोबर झाले होते. पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर तिने मयुरने  गोकुळ परदेशी आणि प्रमोद राजपूत या मित्रांना भेटण्यासाठी जात असल्याचे तिला सांगितले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.  

टॅग्स :Crimeगुन्हा