चारशे रुपयांसाठी हत्या
By Admin | Updated: March 22, 2017 01:29 IST2017-03-22T01:29:35+5:302017-03-22T01:29:35+5:30
मजुरीचे चारशे रु पये दिले तत्काळ दिले नाहीत म्हणून तिघांनी एकाची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

चारशे रुपयांसाठी हत्या
मुंब्रा : मजुरीचे चारशे रु पये दिले तत्काळ दिले नाहीत म्हणून तिघांनी एकाची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.
डायघर भागातील खिडकाळी परिसरातील एका चाळीत राहणाऱ्या पप्पूदर सिंह (मूळ गाव बिहार) या मुकादमाकडे नविन सोरेन उर्फ हनुमान, संजय मरांडी आणि हनुमान किसकू उर्फ दाढी त्यांचे थकीत चारशे रूपये मागण्यासाठी गेले होते. ते नंतर देतो असे सिंह याने तिघांना सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या तिघांनी त्याला एका शेतात बोलवून त्याची हत्या करून मृतदेह निर्जन ठिकाणी फेकून दिला. कुजलेल्या मृतदेहाचा वास पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आली. हत्या केल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतानाही पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे तसेच पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ-डायघर पोलिसांनी याचा यशस्वी तपास केला. (वार्ताहर)