अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण

By Admin | Updated: May 2, 2017 02:35 IST2017-05-02T02:35:22+5:302017-05-02T02:35:22+5:30

नवव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण होऊन तब्बल २१ दिवस उलटले आहेत. याचदरम्यान, अपहरण करणाऱ्या

Kidnapping of minor girl student | अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण

अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण

ठाणे : नवव्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे अपहरण होऊन तब्बल २१ दिवस उलटले आहेत. याचदरम्यान, अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव सांगूनही कळवा पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे त्रस्त महिलेने ठाणे पोलीस आयुक्तांकडे धाव घेऊन त्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीच्या तावडीतून आपल्या मुलीची सुटका करून त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. कळवा येथील हनुमान टेकडी झोपडपट्टीत राहणारी चौदावर्षीय विद्यार्थिनी ७ एप्रिलपासून बेपत्ता झाली आहे.
सकाळी परीक्षेला जात असतानाच तिचे अपहरण झाले. याबाबत, मुलीची आई ज्योती मेश्राम यांनी कळवा पोलिसांकडे त्याच दिवशी तक्र ार नोंदवली. तक्र ारीत त्यांच्या मुलीचे अपहरण सचिन अंभोरेनामक तरुणाने केल्याचा आरोप केल्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आई घरकाम करून उदरनिर्वाह करते.
अपहरण करणाऱ्या संशयित आरोपीचे घर त्यांच्या शेजारीच असून पोलीस त्याच्या घरातील मंडळींची चौकशी करीत नाहीत. त्यामुळे मुलीच्या जीवितास धोका असल्याने त्यांनी गुरु वारी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मदतीची याचना केली. (प्रतिनिधी)

Web Title: Kidnapping of minor girl student