अपह्रत अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:44 IST2021-08-28T04:44:40+5:302021-08-28T04:44:40+5:30

मुंब्रा : तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाने अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात देऊन मुलाची ...

Kidnapped minor girl released from Pune | अपह्रत अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

अपह्रत अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका

मुंब्रा : तीन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलाने अपहरण केलेल्या मुलीची पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुटका करून तिला पालकांच्या ताब्यात देऊन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केली.

मुंब्य्रातील शिवाजीनगरात राहाणाऱ्या या मुलीच्या शेजाऱ्यांकडे हा मुलगा पाहुणा म्हणून २२ ऑगस्टला रक्षाबंधनासाठी आला होता. (पूर्वी तो सहा महिने येथे राहून गेला होता.) दुसऱ्या दिवशी तो मुलीसह पसार झाला होता. दोघेही आंतरधर्मीय असल्यामुळे तिच्या अपहरणाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच काही काळ मुंब्य्रात खळबळ निर्माण झाली होती. याबाबत तिच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शीघ्र गतीने तपास सुरू केला होता. दरम्यान, दोघेही पुण्यात असल्याची माहिती मुलाच्या वडिलांनी दिल्यानंतर पुण्यातील लष्कर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी रात्री दोघांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीनंतर तिला पालकांच्या ताब्यात देऊन मुलाची रवानगी बालसुधारगृहात केल्याची माहिती मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Kidnapped minor girl released from Pune