शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, नेत्यांचे गळ्यात गळे; उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा रंगला कोपरखळ्यांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 06:22 IST

प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. 

ठाणे  : खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून गेले काही दिवस शिवसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्यात सुरू असलेला संघर्ष शनिवारी घोषणाबाजीने दुमदुमला असतानाच प्रत्यक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांच्या गळ्यात गळे घालत महाविकास आघाडी मजबूत करण्याची ग्वाही दिली. मात्र त्याचवेळी कोपरखळ्या, टोलेबाजी यांनीही हा कार्यक्रम रंगला. मागील कित्येक दिवस राजकीय साठमाऱ्यांमुळे खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाबाबत तारीख पे तारीख हा खेळ सुरू होता. अखेर या पुलाचे उद्घाटन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एकत्र फीत कापून केले व या राजकीय वादावर पडदा टाकला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आदी हजर होते. जितेंद्र आव्हाडांची गाडी पुलावरश्रेयावरून मागील कित्येक दिवसांपासून या पुलाचे राजकीय नाट्य रंगत आहे. शनिवारी उद्घाटनाच्या वेळेस आव्हाड आणि शिंदे यांच्या गाड्या कार्यक्रमस्थळी आल्या असता, आव्हाड यांनी आपली गाडी थेट पुलावर नेली आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते कार्यक्रमस्थळी आले.नारदमुनी होऊ नकामहापौर नरेश म्हस्के यांचा आव्हाड यांनी समाचार घेतला. चाणक्यच राहा उगाच नारदमुनी होऊ नका, असा सल्ला दिला.श्रीकांत शिंदेंचे टोचले कानआपल्या बोलण्यामुळे कोणाचे मन दुखावत असेल तर काळजी घ्या, असा ‘वडीलकी’चा सल्ला एकनाथ शिंदे यांनी पुत्र श्रीकांत यांना दिला.पुलास आनंद दिघे यांचे नावशिंदे आणि आव्हाड यांनी महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी होईल असे सांगितले. यावेळी या पुलाचे नामकरण ‘स्वर्गीय आनंद दिघे उड्डाणपूल’ असे करीत या पुलाची फीत शिंदे आणि आव्हाड यांनी एकत्र कापली.उड्डाणपुलाचे श्रेय आमचेच - म्हस्केया उड्डाणपुलाचे श्रेय हे राष्ट्रवादीचे असल्याचा दावा त्यांचे नेते करीत होते. त्याचा समाचार घेताना महापौर नरेश म्हस्के म्हणाले, सर्वांत आधी प्रस्तावाची सूचना ही शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी २००० साली दिली होती. तसेच पाठपुरावा केला. आम्ही विकास करताना कोणत्या पक्षाचा नगरसेवक आहे, हा भेदभाव कधीच केला नाही. याउलट कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघापेक्षा कळवा-मुंब्य्राला एकनाथ शिंदे यांनी नेहमीच अधिक निधी दिल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. आम्ही राजकारण न करता आता हा पूल महाविकास आघाडीच्या प्रयत्नाने झाल्याचे सांगितले.पोलीस हातात माईक घेऊन दोन्हीकडील कार्यकर्त्यांना कोरोनाच्या निर्बंधांची आठवण करून देत होते. मात्र जोशात असलेले कार्यकर्ते आपल्याच धुंदीत होते. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. कार्यक्रमस्थळी एकाच वेळी शिंदे आणि आव्हाड यांच्या गाड्यांचा ताफा आला, आणि कार्यकर्त्यांचा जोश आणखी वाढला. अल्पवयीन मुलेही घोषणाबाजीत सहभागी झाली होती. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJitendra Awhadजितेंद्र आव्हाड