पूल खचल्याने खर्डी-वाडादरम्याची वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST2021-07-20T04:27:44+5:302021-07-20T04:27:44+5:30

आसनगाव : दाेन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील खर्डी ते वाडा या रस्त्यावरील बेलवड गावाजवळील पूल खचून मोठे भगदाड ...

Khardi-Wadadarma traffic closed due to bridge erosion | पूल खचल्याने खर्डी-वाडादरम्याची वाहतूक बंद

पूल खचल्याने खर्डी-वाडादरम्याची वाहतूक बंद

आसनगाव : दाेन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील खर्डी ते वाडा या रस्त्यावरील बेलवड गावाजवळील पूल खचून मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे खर्डी-वाडा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. याबाबत माहिती शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांनी तत्काळ भेट देऊन पाहणी केली.

रस्त्यावरील या पुलाचे आरसीसी काम मंजूर असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी तात्पुरती दुरुस्ती केल्याने रस्ता खचला आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. आमदार दराेडा यांनी घटनास्थळी पाेहाेचून तेथून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला फोन लावून विचारणा केली. त्यावेळी या पुलाची डागडुजी करून देण्यात येईल, असे त्याने सांगितले. यावेळी आमदार दरोडा यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोज विशे, तुकाराम वेखंडे, गणेश घोडविंदे, अशोक वेखंडे, एकनाथ वेखंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत वाड्याला जाणारी वाहतूक बंद राहील. ती तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ प्रमोद दुभेले यांनी केली आहे.

Web Title: Khardi-Wadadarma traffic closed due to bridge erosion