खंडागळेचे मारेकरी मोकाट
By Admin | Updated: March 31, 2017 05:49 IST2017-03-31T05:49:34+5:302017-03-31T05:49:34+5:30
मागील पाच महिन्यांपूर्वी पूर्णा गावातील देवळात सकाळी दर्शनासाठी गेलेल्या रणजित ऊर्फ बंटी खंडागळे यांची

खंडागळेचे मारेकरी मोकाट
भिवंडी : मागील पाच महिन्यांपूर्वी पूर्णा गावातील देवळात सकाळी दर्शनासाठी गेलेल्या रणजित ऊर्फ बंटी खंडागळे यांची हत्या झाली. त्यातील दोघे आरोपी आजतागायत पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यांच्यामुळे बंटी खंडागळेंच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाल्याने आरोपींच्या अटकेसाठी नाभिक महासंघाने पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे धाव घेतली आहे.
२४ आॅक्टोबर २०१६ रोजी खंडागळे याची हत्या झाली. भारत पाटील व रूपेश खंडागळे हे त्यांच्या हत्येचे मुख्य सूत्रधार असून ते फरार आहेत. भारत पाटीलच्या गुंडांकडून सोशल मीडियावरून खंडागळे याच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, न्यायालयीन सुनावणीवेळी आरोपी अभिषेक निंबोलकर याने बंटीचा भाऊ अभिषेक यालाही धमकी दिली होती. बंटी याचा आणखी एक भाऊ प्रफुल्ल यालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याची नाभिक महासंघाने दखल घेत शिष्टमंडळाने आयुक्त सिंग यांची भेट घेतली. तसेच खंडागळे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याबरोबरच आरोपींना अटक करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)