केळव्याच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला

By Admin | Updated: May 9, 2017 00:20 IST2017-05-09T00:20:18+5:302017-05-09T00:20:18+5:30

बहुजन विकास आघाडीचे केळवे ग्रामपंचायतींचे सरपंच अरविंद वर्तक ह्यांचावर आज कार्यालया समोरच हल्ला करण्यात आला.

Kenny's Sarpanches fatal attacks | केळव्याच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला

केळव्याच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : बहुजन विकास आघाडीचे केळवे ग्रामपंचायतींचे सरपंच अरविंद वर्तक ह्यांचावर आज कार्यालया समोरच हल्ला करण्यात आला.त्यांच्या इनोव्हा गाडीतून बाहेर खेचून त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ह्या प्रकरणी केळवे पोलिसात तीन स्थानिका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज सकाळी केळवे बीचवर लावण्यात येणार्या बाईक,त्यांना आकारण्यात येणारा कर ई कारणा वरून बाईकवाले आणि सरपंच वर्तक ह्यांची आपसात बाचाबाची झाली होती.त्यामुळे बाईकवाल्यांना बाईक बीचवर लावण्यास मज्जाव करण्यात आला होता.त्यामुळे या दोन्ही लोकांमध्ये तणावाचे वातावरण होते.सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सरपंच वर्तक हे आपल्या इनोव्हा गाडीने ग्रामपंचायत कार्यालयात येत असताना त्यांची गाडी कार्यालया बाहेर अडवून त्यांना बाहेर काढीत दिनेश भास्कर पाटील, दीपाल दिनेश पाटील, दीपक मोरेश्वर चौधरी, संजय जनार्दन किणी यांनी लाथा,बुक्क्यांनी मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती केळव्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिसंग पाटील ह्यांनी दिली.
अश्या पाशर््वभूमीवर आज सरपंच वर्तक ह्यांच्यावर त्यांच्या कार्यालया समोर झालेल्या हल्ल्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. केळवे ग्रामपंचायतींवर बहुजन विकास आघाडी आण िशिवसेना युतीची सत्ता असून 27 मे ला केळव्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.ह्या पाशर््वभूमीवर हल्ल्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापणार आहे.

Web Title: Kenny's Sarpanches fatal attacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.