शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीचे चार वर्षांत १२५ कोटी ‘खड्ड्यांत’, रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 01:48 IST

कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली परिसरांत अतिवृष्टीमुळे सगळ्याच रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडत आहे. मागील चार वर्षांत खड्डे बुजवण्यावर महापालिकेने किमान १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. तरीही, रस्त्यांवर खड्डे कायम आहेत. त्यामुळे हा निधी वाया गेल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.महापालिकेतील मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी सांगितले की, महापालिकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली. त्यानंतर, चार वर्षांत महापालिकेच्या अर्थसंकल्पात खड्डे बुजवण्यासाठी केलेल्या आर्थिक तरतुदींवर नजर टाकल्यास १२५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.तरीही, रस्त्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या वर्षी जोरदार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले असून, रस्ते वाहून गेल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिका खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करते. या निधीतून वर्षभरात खड्डे बुजवण्याचे काम केले जाते. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही खड्डे योग्य प्रकारे बुजवले जात नाहीत. खड्डे बुजवण्याचे काम निकृष्ट होत असल्याने ते टिकत नाही. एखादा रस्ता तयार केल्यावर त्याची देखभाल दुरुस्ती व त्यावर खड्डा पडणार नाही, यासाठी कंत्राटदाराकडून तीन वर्षे हमीपत्र घेतले पाहिजे. चार वर्षांपूर्वी महापालिकेने तशी तजवीज केली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या, अशी स्थिती उद्भवली आहे.मागच्या वर्षी कल्याण शहरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतर महापालिकेने १३ कोटी रुपये खड्डे बुजवण्यासाठी तातडीने मंजूर केले होते. मागच्या वर्षी मुंबई-गोवा मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी ३० कोटींची तरतूद सरकारने केली होती. मात्र, महापालिकेने महापालिका हद्दीतील खड्डे बुजविण्यासाठी १३ कोटींची तरतूद केल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. २००९ मध्ये महापालिकेस महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत काँक्रिटीकरणाचे रस्ते तयार करण्यासाठी ४०१ कोटी रुपये दोन टप्प्यांत मंजूर केले होते. त्यानंतर, महापालिकेने महापालिकेच्या निधीतून ४३ रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम घेतले. त्यानंतर, आजही बहुतांश रस्ते हे डांबरी आहेत. त्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम हाती घेतल्यास खड्डे बुजवण्यावर होणारा खर्च कमी होऊ शकतो. खड्डे पडू नयेत, यासाठी महापालिकेने यापूर्वी आॅस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर केला होता. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही.दर्जेदार काम करण्याची गरजमहापालिका हद्दीत जास्त पाऊस पडत असल्याने खड्डे पडतात, असे कारण महापालिकेकडून पुढे केले जाते. मात्र, खड्डे बुजवण्याचे काम दर्जेदार केल्यास खड्डेच पडणार नाही. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. कंत्राटदारावर वचक नसतो. त्यामुळे खड्ड्यांचा सामना सामान्य प्रवासी, नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतो, याकडे हळबे यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाPotholeखड्डे