शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

होळीच्या तोंडावर वेतन थकलं, कडोंमपा परिवहन कामगारांचे ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 15:41 IST

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकले आहे.

डोंबिवली - कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांचे वेतन दोन महिन्यापासून थकले आहे. गुरुवारी (1 मार्च) होळी सणाच्या दिवशी कामगारांनी परिवहन सभापती संजय पावशे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. होळी सण कामगारांच्या कुटुंबीयांनी कसा साजरा करायचा असा संतप्त सवाल उपस्थित केला.  परिवहन कामगार कर्मचारी संघटना ही मान्यता प्राप्त संघटना आहे. या संघटनेचे सरचिटणीस शरद जाधव यांनी परिवहन सभापतीच्या दालनासमोर आज दुपारपासून ठिय्या आंदोलन सुरु केले. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. होळीची सुट्टी नसल्याने महापालिकेचे कामकाज आज सुरू होते. परिवहन सभापती पावशे हे दालनात येण्यापूर्वीच त्यांच्या दालनाबाहेर कामगारांनी ठिय्या आंदोलन सुरु केले. सरचिटणीस जाधव यांनी सांगितले की, कामगारांना गेल्या दोन महिन्यापासून पगार मिळालेला नाही. आज होळीसारखा मोठा सण कर्मचा-यांच्या हातात पैसा नसल्याने त्यानी कसा साजरा करायचा.

त्याच्या घरात पुरणाची पोळी कशी बनेल असा प्रश्न उपस्थित केला. कामगारांचे पगार वेळेवर होत नाही. नेहमीच उशिराने होता. परिवहन कामगारांचे पगार झालेले नसले तरी कामगारांनी काम बंद आंदोलन केलेले नाही. दररोज परिवहनला साडे पाच लाखाचे उत्पन्न कामगार मिळवून देतात. कामगारांनी आज त्यांचे कर्तव्य बजाविल्यानंतर हे आंदोलन सुरू केले आहे. कामगारांना पगार मिळत नाही. तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे इशारा जाधव यांनी दिला आहे. परिवहन उपक्रमाला महापालिकेकडून सापत्न वागणूक दिली जाते. मूलभूत सोयी सुविधा कामगारांना उपलब्ध करुन दिल्या जात नाही. परिवहनमध्ये जवळपास 550 कामगार कार्यरत आहे. 1999 सालापासून कामगारांची थकीत देणी दिलेली नाहीत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी चालक व वाहक हे अत्यावश्यक सेवा म्हणून कामावर येतात. त्याच्या मोबदला कामगारांना दिला जात नाही. कामगारांचा आरोग्य विमा काढला जात नाही. हा उपक्रम चांगला चालावा.

कामगारांना पगार मिळावे यासाठी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. 14 वर्षापासून कंत्रटी कामगार सात ते आठ हजार रुपये पगारावर काम करीत आहेत. अन्य परिवहन उपक्रमात चालक वाहकाला किमान 20 हजार रुपये पगार मिळतो. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमात कमी पगारावर कामगारांना राबवून घेतले जाते. कमी वेतनही वेळेवर दिले जात नाही. दरम्यान थकीत वेतन आणि कर्मचा-याच्या मागील फरकाची रक्कम 4 मार्चच्या आत मिळाली नाही तर परिवहन कामगार बेमुदत चक्का जाम आंदोलन 5 मार्च पासून करतील असा इशारा परिवहन मजदूर युनियनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी महापालिका प्रशासनास दिला आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाagitationआंदोलनHoli 2018होळी २०१८