केडीएमसीची कीटकनाशक फवारणी
By Admin | Updated: October 14, 2016 06:17 IST2016-10-14T06:17:30+5:302016-10-14T06:17:30+5:30
साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव पाहता याच्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने केडीएमसी प्रशासनाने जलजन्य

केडीएमसीची कीटकनाशक फवारणी
कल्याण : साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव पाहता याच्या नियंत्रणासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने केडीएमसी प्रशासनाने जलजन्य व कीटकजन्य आजारांबाबत व्यापक मोहीम उघडली आहे. यात काही ठिकाणी केलेल्या सर्वेक्षणात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. ही मोहीम २२ आॅक्टोबरपर्यंत चालणार आहे.
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेऊन नगररचना विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि आरोग्य विभागांवर जबाबदारी निश्चित केली आहे. कल्याण विभागाच्या पथकाने मोहना गावठाण क्रमांक ३ येथे ८४१ लोकवस्ती असलेल्या भागातील १८७ घरांचे सर्वेक्षण केले असता त्या ठिकाणी एक तापाचा रुग्ण आढळला. दोन घरांमध्ये डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. या ठिकाणी २१ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
मांडा पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ८ मधील ४१५ घरांचे सर्वेक्षण झाले असून १८६८ लोकसंख्येच्या वस्तीत दोन तापाचे रुग्ण आढळल्याचा दावा पथकाने केला आहे. या ठिकाणच्या दोन घरांमध्येही डासांच्या अळ्या सापडल्या असून या परिसरातील २० जणांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले आहेत. संबंधित भागातील सिद्धिविनायक, मेहता ग्रुप ओमसाई, विराट कन्स्ट्रक्शन या ठिकाणी औषध फवारणी केली.