केडीएमसी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोटारीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:49+5:302021-03-28T04:37:49+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व डॉ. समीर सरवणकर यांना घरी सोडण्यासाठी मोटार ९० फूट ...

KDMC medical officer's car hit | केडीएमसी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोटारीला धडक

केडीएमसी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मोटारीला धडक

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील व डॉ. समीर सरवणकर यांना घरी सोडण्यासाठी मोटार ९० फूट रस्त्याने जात असताना त्यांच्या मोटारीला एका अन्य मोटारचालकाने जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीचा दरवाजा दबला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता घडली. मोटारचालक जगन्नाथ शेळके यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-----------

पाण्याच्या मीटरची चोरी

कल्याण : कल्याण पश्चिमेतील दूधनाका परिसरात राहणारे विनायक पाळंदे यांचे तीन हजार रुपये किमतीचे पाण्याचे मीटर अनो‌‌‌‌ळखी चोरट्यांनी चोरून नेले. अन्य एका घटनेत गफूर डोन चौकात राहणारे वकील अकिफ काजी यांच्या सोसायटीचे पाण्याचे मीटर चोरीस गेले आहे. मीटरची किंमत १५०० रुपये आहे. या दोन्ही पाणी मीटर चोरीच्या घटनेबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

------------

दुचाकीची चोरी

कल्याण : पश्चिमेतील चिकणघर परिसरात राहणारे नारायण म्हाडसे यांनी त्यांची दुचाकी कल्याण एसटी डेपोतील आरक्षण खिडकीजवळ उभी करून ठेवली असता चोरीस गेली. दुचाकीची किंमत ३० हजार रुपये होती. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--------------

Web Title: KDMC medical officer's car hit