कविता चौतमोल होणार पनवेलच्या पहिल्या महापौर

By Admin | Updated: July 6, 2017 14:59 IST2017-07-06T14:59:08+5:302017-07-06T14:59:08+5:30

पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा बहुमान भाजपाच्या कविता किशोर चौतमोल यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kavita Chautala will be the first mayor of Panvel | कविता चौतमोल होणार पनवेलच्या पहिल्या महापौर

कविता चौतमोल होणार पनवेलच्या पहिल्या महापौर

ऑनलाइन लोकमत

नवी मुंबई, दि. 6 - पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा बहुमान भाजपाच्या कविता किशोर चौतमोल यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरूवारी दुपारी त्यांनी पक्षाच्यावतीने महापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या महापौर पदाचा मान मिळणार असल्याने त्यांच्यावर शहरवासीयांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. 
महापालिका निवडणूकीत भाजपाने 78 पैकी 51 जागांवर विजय प्राप्त करून स्पष्ट बहुमत मिळविले होते. निवडणूक निकालापासून महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याविषयी उत्सूकता निर्माण झाली होती. अखेर प्रभाग 16 मधून निवडून आलेल्या डॉक्टर कविता चौतमोल यांची पक्षाने निवड केली आहे. एस. सी. मुथा आर्याग्ल वैद्यकिय महाविद्यालय सातारा येथून त्यांनी वैद्यकिय शिक्षण पुर्ण केले आहे. त्यांचे पती किशोर चौतमोल हे आमदार प्रशांत ठाकूर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. यामुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून त्यांच्या नावाची महापौर पदासाठी चर्चा सुरू होती. 
 गुरूवारी दुपारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पहिल्या महापौरपदासाठी सुशीक्षीत चेहरा देण्यात आल्यामुळे शहरवासीयांनीही समाधान व्यक्त केले. 

Web Title: Kavita Chautala will be the first mayor of Panvel