शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
4
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
5
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
6
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
7
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
8
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
9
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
10
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
11
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
12
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
13
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
14
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
15
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
16
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
17
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
18
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
19
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
20
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
Daily Top 2Weekly Top 5

काशिमीरा भागातील बनावट कीटकनाशकांचा कारखाना उघडकीस, अग्निशमन दलाने ठोकले सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 02:54 IST

काशिमीरा भागातील डाचकुलपाड्यात एका बेकायदा पत्रा गोदामात बनावट किटकनाशक स्प्रे बनवण्याचा कारखानाच चालवला जात असल्याचे उघड झाले आहे.

मीरा रोड : काशिमीरा भागातील डाचकुलपाड्यात एका बेकायदा पत्रा गोदामात बनावट किटकनाशक स्प्रे बनवण्याचा कारखानाच चालवला जात असल्याचे उघड झाले आहे. रहिवाशांनी गॅस गळतीच्या तक्रारी केल्यानंतर अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सदर बनावट किटकनाशक स्प्रेचा कारखाना आढळून आला. याप्रकरणी २४ गॅस सिलेंडर, ४०० रिकामे स्प्रे, किटकनाशक केमीकल आदींसह यंत्र सामुग्री जप्त करून कारखाना सील केला आहे. गॅस गळती वेळीच थांबवल्याने दुर्घटना टळल्याचे रहिवासी म्हणाले.काशिमीऱ्याच्या डाचकुलपाडा भागात राहणाºया रहिवाशांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कारखान्यातून गॅस गळतीच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागला. रहिवाशांनी याची माहिती स्थानिक भाजप नगरसेवक सचीन केसरीनाथ म्हात्रे यांना दिल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यावेळी आतमध्ये किटकनाशक स्प्रे भरण्याचे काम चालले होते. जमावाला पाहून १० ते १२ कामगार पळून गेले.म्हात्रे यांनी काशिमीरा पोलीस ठाणे आणि पालिकेच्या अग्निशमन दलास याची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस काही वेळात घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आधी स्प्रे भरण्यासाठी जोडलेल्या गॅसच्या जोडण्या काढून गॅस गळती थांबवली. त्यानंतर घटनास्थळी असलेले साहित्य गोळा करायला सुरवात केली. भारत गॅसचे २४ गॅस सिलेंडर, स्प्रेच्या ४०० रिकाम्या बाटल्या, हिट आदी नाव असलेल्या जुन्या भरलेल्या तसेच रीकाम्या बाटल्या, तीन बॅरल भरुन असलेले केमीकल, स्प्रे भरण्यासाठीची यंत्र सामुग्री आदी साठा आढळून आला. वीज पुरवठा बंद करुन कारखान्यास लगेच टाळे ठोकण्यात आले.त्यानंतर मंगळवारी दुपारी अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान साठा जप्त करण्यास गेले होते. त्यावेळी स्प्रे भरलेल्या बाटल्यांचे बाहेरील उष्णतेमुळे स्फोट होऊ लागले. त्यामुळे त्या बाटल्या पुन्हा कारखान्यात सावलीत ठेवण्यात आल्या.याप्रकरणी बुधवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे प्रभारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले. गफुर शेख नावाच्या इसमाचा हा कारखाना असल्याचे समोर आले असून, अग्नीशमन दलापासून अन्य कोणतीही आवश्यक परवानगी नसल्याची माहिती त्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणे