शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत पावणे दहा लाखाचा पानमसाला जप्त, भाईंदर पोलिसांनी केली कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:32 IST

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

मीरारोड :  काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत बेकायदा पानमसालाचे मोठे गोदाम सुरु असल्याने ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशाने भार्इंदर पोलिसांनी सदर गोदामावर धाड टाकुन पावणे दहा लाखांचा बेकायदा पानमसाल्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी ती कार पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत.काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील माशाचा पाडा दर्ग्याजवळ मोठा प्रमाणात अनधिकृत बांधकामे पालिका अधिकारी व स्थानिक नगरसेवकांच्या आशिर्वादाने झाली आहेत. आदिवासींच्या तसेच ना विकास क्षेत्रातील या जमीनींवर झालेल्या बेकायदा बांधकामामधून बेकायदा धंदे वाढीस लागल्याचे समोर येत आहे.सदर ठिकाणी मीना घाटाळ यांच्या एका बेकायदा बांधकामात मोठ्या प्रमाणात गुटखा सृदश बंदी असलेल्या पानमसाल्याचा साठा केला जात असल्याने व सदरचा माल चोरुन खाजगी कार मधुन मुंबई, ठाणे आदी भागात पुरवठा केला असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांच्या निदर्शनास आली होती.त्या अनुषंगाने पाटील यांनी भार्इंदर पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक एस.एच.बिस्वास व त्यांच्या पथकास कारवाईचे आदेश दिले होते. मंगळवारी रात्री बिस्वास व पथकाने धाड टाकली असता तेथे तब्बल ६० गोण्यां मध्ये भरलेला मोठा साठा आढळुन आला. त्याची किंमत ९ लाख ६४ हजार इतकी आहे. सदर साठा जप्त करुन पोलीसांनी वाहतुकीसाठी वापरल्या जाणारया ३ कार जप्त केल्या आहेत. तर येथुन संतोष शंभुनाथ थटेरा (३८) , संदिप बनारसी थटेरा (२९) व निलेश राजेंद्रप्रसाद गुप्ता (३१) सर्व रा. भास्कर भवन, भाजी मार्केट, बाळाराम पाटील मार्ग, भार्इंदर या तीघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन त्यांची नोंद करण्यात आली.अन्न निरीक्षक यांनी जप्त बेकायदा पानमसाल्याचा साठा ताब्यात घेऊन त्याची नोंद केली असुन नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यावर सदर साठा नष्ट करण्यात येईल. त्या नंतर सबंधित तीघां विरोधात खटला दाखल केला जाईल असे अन्न व औषध प्रशासनाच्या सुत्रां कडुन सांगण्यात आले.सदरचा बेकायदा पानमसाला गुटखा सृदश असुन सदर गोदामात तो गुजरात व अन्य ठिकाणां वरुन चोरुन टॅम्पो वा ट्रकने आणला जायचा. व नंतर येथुन सर्वत्र त्याचा पुरवठा कार ने केला जायचा. 

टॅग्स :Crimeगुन्हा