शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

काशीगावचा ओसाड बाजार बनला मद्यपींचा अड्डा , पालिकेचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 02:24 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी काशीगाव येथे दुमजली इमारत बांधली. तिच्या तळ मजल्यावर बाजार सुरू होणार असतानाच फेरीवाल्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेला हा बाजार सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे.

भार्इंदर  - मीरा-भार्इंदर महापालिकेने फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी काही वर्षांपूर्वी काशीगाव येथे दुमजली इमारत बांधली. तिच्या तळ मजल्यावर बाजार सुरू होणार असतानाच फेरीवाल्यांनी तेथे जाण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक वर्षांपासून ओसाड पडलेला हा बाजार सध्या मद्यपींचा अड्डा झाला आहे.शहरात चार वर्षांपूर्वी पाच हजार फेरीवाले होते. सध्या त्यांची संख्या हजारोंच्या पटीने वाढली आहे. दरम्यान, या फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पालिकेने भार्इंदर पश्चिमेकडील मॅक्सस मॉलमागे कस्तुरी गार्डन रोडवर तसेच काशीगाव येथील सिल्व्हर सरिता गृहसंकुलासमोर एक व दोन मजली इमारती बांधल्या. या इमारतींच्या तळ मजल्यावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचा हेतू होता. परंतु, त्यात व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांनी नकार दिला.भार्इंदर येथील इमारतीत स्थानिक संस्था कराचे मुख्यालय थाटण्यात आले व काशीगाव येथील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर बेघरांसाठी रात्रनिवारा सुरू केला. रात्रनिवाऱ्यात मूळ लाभार्थी वंचित राहू लागले. याखेरीज, एका लघुचित्रपट दिग्दर्शकाने तेथेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याने रात्रनिवारा बंद केला. दोन वर्षे ही इमारत ओसाड पडली होती. स्थानिक संस्था कर बंद झाल्यानंतरही भार्इंदर पश्चिमेकडील इमारतीत अद्याप फेरीवाल्यांना सामावून घेतलेले नाही. तूर्तास इमारतीबाहेर दररविवारी शेतकºयांना बाजार लावण्यासाठी मुभा दिली आहे.काशीगाव इमारतीत रात्रनिवारा सुरू नसला, तरी त्याच्या तळ मजल्यावर पालिकेने खाजगी सुरक्षारक्षकांचा निवारा मात्र सुरू केल्याचे दिसून येते. हे सुरक्षारक्षक पालिकेला कंत्राटी सेवा देत असून त्यांच्या निवाºयाची जबाबदारी पालिकेची नाही. ती कंत्राटदाराची असतानाही पालिकेने त्या इमारतीच्या तळ मजल्यावर खाजगी सुरक्षारक्षकांना राहण्याची सोय केली आहे.रात्री मद्याची पार्टी झोडली जाते. पार्टी संपल्यानंतर मद्याने भरलेले ग्लास, खाद्यपदार्थ व बाटल्यांचे वेष्टन तेथेच टाकण्यात येतात.पालिका इमारतीत मद्यपींचा धिंगाणा चालत असल्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करूनही त्याला अद्याप आळा बसलेला नाही. यामुळे आसपासच्या रहिवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने हा प्रकार त्वरित बंद करावा.- अरुण सातपुते, रहिवासीइमारतीत रात्री मद्यपी येत असल्याची तसेच खाजगी सुरक्षारक्षक बेकायदा तेथे राहत असल्याबाबत आस्थापना विभागाकडे तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणली जाणार आहे.- दीपक खांबित, कार्यकारी अभियंता

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर