शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कासारवडवली पोलिसांनी महिलेला मिळवून दिली एक लाखांची सोन्याची बांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 22:09 IST

कासारवडवली या भूमी एकर्स परिसरातून कामानिमित्त पायी जात असताना आकांक्षा श्रीवास्तव या महिलेची तीन तोळ्यांची एक लाखांची सोन्याची बांगडी हरवली होती. तिचा कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये शोध घेऊन ती शनिवारी त्यांना परत केली. आईची आठवण असलेली बांगडी परत मिळवून दिल्याने आकांक्षा श्रीवास्तव यांनी पोलिसांचे आभार मानले आहे.

ठळक मुद्दे रेझिंग डे सप्ताहाचे औचित्ययवतमाळमध्ये लागला शोध

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : हिरानंदानी इस्टेट, कासारवडवली या भूमी एकर्स परिसरातून कामानिमित्त पायी जात असताना आकांक्षा श्रीवास्तव या महिलेची तीन तोळ्यांची एक लाखांची सोन्याची बांगडी हरवली होती. तिचा कासारवडवली पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांमध्ये शोध घेऊन ती शनिवारी त्यांना परत केली. रेझिंग डे च्या औचित्याने पोलिसांनी मेहनत घेऊन आईची आठवण असलेली बांगडी परत केल्याने आकांक्षा श्रीवास्तव यांनी समाधान व्यक्त केले आहे.हिरानंदानी इस्टेट येथे राहणाऱ्या श्रीवास्तव या ९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ‘भूमी एकर्स’ परिसरातून आपल्या काही कामानिमित्त पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या हातातील तीन तोळ्यांची सोन्याची बांगडी रस्त्यावर पडून गहाळ झाली होती. बराच शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे त्याबाबत त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार आर.एस. चौधरी आणि आर.एस. महापुरे यांनी घटनास्थळी जाऊन अनेक सीसीटीव्हींच्या फुटेजची पडताळणी केली. शिवाय, १०० ते १५० महिलांकडेही चौकशी केली. अखेर, एका सीसीटीव्हीमध्ये एक महिला ती बांगडी उचलून घेऊन जाताना आढळले. ती खासगी सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आली. या सुरक्षारक्षक कंपनीतून तिच्या नावाची माहिती काढून तिचा शोध घेतला असता, ती वाघबीळ येथे राहणारी होती. मात्र, ती यवतमाळ येथे गेली होती. तिला मोबाइलद्वारे विश्वासात घेतल्यानंतर तिने ही बांगडी सापडल्याचे पोलिसांना सांगितले. तिने कासारवडवली पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांच्या मार्फतीने या महिलेची बांगडी ११ जानेवारी रोजी परत केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक खैरनार यांनी ओळख पटवून श्रीवास्तव यांना त्यांची बांगडी परत केल्याने त्यांनीही पोलिसांचे आभार मानले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीGoldसोनं