शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

राष्ट्रीय मतदार दिनी करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीने युवा मतदारांमध्ये चैतन्य  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 17:30 IST

जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ३३० एवढ्या तृतीयपंथीची ( थर्ड जेन्डर) मतदार म्हणून नोंदणी झाली असून गेल्या वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन युवा मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासन करू शकले आहे

ठाणे - जिल्ह्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजे ३३० एवढ्या तृतीयपंथीची ( थर्ड जेन्डर) मतदार म्हणून नोंदणी झाली असून गेल्या वर्षभरात २ लाख ११ हजार नवीन युवा मतदारांची नोंदणी जिल्हा प्रशासन करू शकले आहे. आज आठव्या राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात ही माहिती जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावणार असल्याची शपथ उपस्थितांना दिली.दोन दिवसांपासून ज्यांची  उत्सुकता होती त्या प्रसिध्द अभिनेत्री करिष्मा कपूर, बिपाशा बसू यांच्या उपस्थितीमुळे गडकरी रंगायतनमधील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. या दोघींनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले पाहिजेच, तो आपला हक्क आहे असे सांगितले आणि उपस्थितांकडून वदवून घेतले.कार्यक्रमात बोलतांना प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे यांनी देखील “मतदार नोंदणी आरंभ हाच राष्ट्र भक्तीचा शुभारंभ” असे घोषवाक्य दिले. कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक डॉ महेश पाटील,  अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण ,मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विवेक भीमनवार, जिल्हा सैनिक अधिकारी प्रांजळ जाधव यांची  उपस्थिती होती.सध्या ठाणे जिल्ह्यात ५९ लाख २७ हजार ७ इतके मतदार आहेत. सेना दलातील मतदारांची नोंदणी आता ऑनलाईन पद्धतीने सुरु झाली असून जिल्ह्यातील  २ हजार १८६ जणांनी मतदार नोंदणी  केली आहे . यावर्षी प्रथमच ERO NET पद्धत वापरण्यात आली. म्हणजे मतदार नोंदणी करतांना मतदारांची कागदपत्रे स्कॅन करून जतन करून ठेवण्यात येतात. अशी प्रणाली वापरणारा महाराष्ट्र हा देशात दुसर्या क्रमांकावर आहे. या पद्धतीत ठाणे जिल्ह्यात ४३ हजार ६९६ इतक्या मतदारांची नोंदणी झाली अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

विभागीय आयुक्त डॉ जगदीश पाटील यांनीही मतदानाचे महत्व विषद केले. याप्रसंगी भारताचे मुख्य निवडणूक ओमप्रकाश रावत यांचा देखील दृकश्राव्य संदेश दाखविण्यात आला.   

सहस्त्रक मतदार, दिव्यांग मतदारांचा सत्कारयाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ज्यांचा जन्म १ जानेवारी २००० रोजी झाला असून मतदार नोंदणी केली आहे अशा  सहस्त्रक मतदारांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दिव्यांग युवा मतदारांचाही सत्कार झाला. जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय निवडणूक विषयक सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या मुलांचाही गौरव करण्यात आला. सैन्यदलातील नव्याने मतदार म्हणून नोंदणी  झालेल्या मुकेश कांबळे, आर सी शर्मा, जयंत गोगटे, जगन्नाथ सिन्नरकर, शिवालीनाथ थोरात यांचाही सत्कार करण्यात आला.  शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जीवनगाणी या प्रसाद महाडकर यांच्या वाद्यवृंदाने आणि गायिका सोनाली कर्णिक, मंदार आपटे यांच्या गीतांनी सभागृहात ठेका धरायला लावला. योगेश भिडे यांच्या मतदारांसाठी असलेल्या पथनाट्यानेही वाहवा मिळविली.

टॅग्स :Bipasha Basuबिपाशा बासू