शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
6
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
7
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
9
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
10
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
11
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
12
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
13
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
14
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
15
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
16
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
17
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
18
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
19
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
20
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप

रायते येथील डाॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे काेराेना रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 23:50 IST

रुग्णाच्या मुलीचा आराेप : ऑक्सिजन संपल्याचे सांगून दिला डिस्चार्ज

लाेकमत न्यूज नेटवर्कटिटवाळा : कल्याण तालुक्यातील रायते येथील कोविड रुग्णालय असलेल्या लक्ष्मी रुग्णालयात पाच दिवसांपासून उपचार सुरू असलेल्या टिटवाळा येथील किसन म्हात्रे (वय ६९) या रुग्णाला ऑक्सिजन संपल्याचे सांगून दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. त्यानंतर काही तासांतच म्हात्रे यांचे टिटवाळा येथील एका रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याबाबत म्हात्रे यांच्या मुलीने लक्ष्मी रुग्णालयातील डाॅक्टरांच्या उपचारांतील हलगर्जीपणामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आराेप करून कारवाईची मागणी केली आहे.किसन म्हात्रे यांना १६ एप्रिलला रायते येथील लक्ष्मी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, पाच दिवसांत त्यांच्या प्रकृतीत काेणतीच सुधारणा झाली नव्हती. याचदरम्यान येथील डॉ. दिनेश भोईर यांनी ऑक्सिजन संपले असल्याचे कारण देऊन सायंकाळी रुग्णाला दुसरीकडे हलविण्यास सांगितल्याचे मृताची मुलगी दीपाली भाटले यांनी सांगितले. डाॅक्टरांकडे वडिलांच्या प्रकृतीबाबत चाैकशी केल्यास रुग्णामध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले जात हाेते. मात्र, २१ एप्रिलला डॉ. भोईर यांनी ऑक्सिजन संपणार असल्याचे कारण देऊन रुग्णाला हलवा, असे सांगितले़ तसेच बिलाचे एक लाख ४५ हजार रुपये भरणा करा, असे फर्माविले. पूर्ण बिल अदा करीत असाल तरच रुग्णाला डिस्चार्ज देऊ, अशी भूमिका डॉ. भोईर यांनी घेतली. अखेर टिटवाळ्यातील समाजसेवक विजय देशेकर यांनी मध्यस्थी करून उद्या देतील, असे सांगून रात्री उशिरा रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. त्यानंतर रात्री १०.३० वाजता रुग्णास टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे अर्ध्या तासातच किसन म्हात्रे यांचा मृत्यू झाला.दरम्यान, म्हात्रे यांची मुलगी दीपाली भाटले म्हणाल्या की, औषधांचे ५३ हजार रुपये बिल झाले होते, तर रुग्णालयाने एक लाख ४५ हजार रुपयांचे पाच दिवसांचे बिल काढले होते, तसेच माझ्या वडिलांचा २० तारखेला ईसीजी काढला होता. तो नॉर्मल नसल्याचे आमच्यापासून डॉक्टरांनी लपवले. त्यानंतर ऑक्सिजन संपल्याचा बहाणा करून त्यांना डिस्चार्ज दिला. त्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू लक्ष्मी रुग्णालयाच्या डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात आली असल्याचेही भाटले यांनी सांगितले.. 

आराेपांबाबत डाॅक्टरांचा इन्काररायते येथील लक्ष्मी रुग्णालयाचे डॉ. दिनेश भोईर यांनी आराेपांचा इन्कार केला आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपणार असल्याचे त्यांना सायंकाळी सांगण्यात आले. त्यानंतरही त्यांनी रुग्णवाहिका रात्री उशिरा आणली, तसेच १७ इंजेक्शन त्यांना देऊन रेमडेसिविर आमच्याकडून एक तर त्यांनी दोन आणले होते, तसेच या बिलामध्ये ब्लड, एक्स-रे, पॅथॉलॉजी, मेडिकल आणि रुग्णालयातील ऑक्सिजन इत्यादी मिळून ५५ हजार रुपये घेतल्याचे डॉ. भोईर यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस