शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

कपिल पाटील यांच्या मिरवणुकीत सेनेचा टक्का कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 12:14 AM

भिवंडीत भाजपचे शक्तिप्रदर्शन : पक्षाचे झेंडेही शिवसैनिकांनी उचलले नाहीत, श्रमजीवी संघटनेच्या महिलांची लक्षणीय उपस्थिती

भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीतील भाजप, शिवसेना, आरपीआय (आ) व श्रमजीवी संघटनेच्या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी सोमवारी भाजप कार्यकर्त्यांची मिरवणूक काढून उमेदवारी अर्ज सादर केला. या मिरवणुकीत शिवसेनेचे मोजकेच पदाधिकारी सहभागी झाले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजप उमेदवार कपिल पाटील यांच्या मिरवणुकीस शिवाजी चौक येथून सोमवारी दुपारी १२ वाजता प्रारंभ झाला. याप्रसंगी काढलेल्या प्रचाररथात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे, शांताराम मोरे, भाजपा आमदार महेश चौघुले, आ. नरेंद्र पवार, सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, शहरप्रमुख सुभाष माने, माजी आमदार विवेक पंडित, दौलत दरोडा यांच्यासह भाजपाचे व सेनेचे मोजके पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी गोकुळनगर भागातील जैन मंदिराचे दर्शन घेऊन पाटील मार्गस्थ झाले.

ही मिरवणूक वंजारपाटीनाकामार्गे प्रांत कार्यालयातील मुख्य निवडणूक कार्यालयात पोहोचली. तिथे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे यांच्याकडे कपिल पाटील यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड यासह भिवंडी शहर व ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्ते, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते, आरपीआयचे कार्यकर्ते असे सुमारे १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते या मिरवणुकीत सामील झाले होते.मिरवणुकीत सामील होणाऱ्या शिवसेना व भाजप कार्यकर्त्यांसाठी शिवाजी चौकात भाजप व शिवसेनेचे झेंडे ठेवले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्ते लगेचच झेंडे हाती घेऊन मिरवणुकीत सामील झाले; मात्र शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते झेंडे घेण्यासाठी पुढे आले. त्यामुळे मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर शिवसेनेचे बरेच झेंडे तसेच राहिले. विशेष म्हणजे, श्रमजीवी संघटनेच्या महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सामील झाल्या होत्या. त्यांनी श्रमजीवीचे झेंडे हाती घेतले होते.मिरवणुकीत कल्याण, शहापूर व विरार येथील ढोल पथके सामील झाले होते. त्यावर, श्रमजीवीच्या काही महिलांनी ठेका धरला होता. मिरवणूक वाजतगाजत निवडणूक कार्यालयात गेली. मात्र, मिरवणुकीत घोषणांचा दुष्काळ पडला होता. कडक उन्हात मिरवणूक निघाल्याने कार्यकर्ते अक्षरश: भाजून निघाले.ठिकठिकाणी लहान, मोठी वाहने उभी असल्याने काही ठिकाणी मिरवणुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे शालेय बसनादेखील वेळेवर विद्यार्थ्यांना पोहोचवता आले नाही. त्यामुळे वाहतूक पोलिसांचे नियोजन कोलमडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडी