शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

कपिल पाटील यांना डावलल्याने मानापमान नाट्य; छायाचित्रावरून केंदीय मंत्र्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी ठाणे विभागीय अध्यक्ष व केंद्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी ठाणे विभागीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचे छायाचित्र लावण्यात न आल्याने मानापमान नाट्य सुरू झाले. याबाबत पाटील यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. कार्यक्रमात बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.  नड्डा यांच्यासह देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांची छायाचित्रे लावण्यात आली होती. 

ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील रेमंड मैदानाशेजारी असलेल्या जागेत भाजपच्या प्रशस्त ठाणे विभागीय कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

बॅनरवर पाटील यांचे छायाचित्र नसल्याबद्दल शहराध्यक्ष संजय वाघुले आणि माजी शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कपिल पाटील ठाणे विभागीय अध्यक्ष होते, तसेच ते विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री असल्याने त्यांचे छायाचित्र लावण्याच्या सूचना केल्या होत्या. असे असतानाही, हा बॅनर बदलण्यात आला नसल्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठाणे विभागीय कार्यालयातून जनतेच्या हिताचे कामे होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मात्र, या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी दुसऱ्या मजल्यावरील तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाच्या पाठीमागील बॅनरवर कपिल पाटील यांचे छायाचित्र लावले नसल्याची चर्चा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.

टॅग्स :Kapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलthaneठाणे