कपिल पाटलांचे बदलापूर शिवसेनेसोबतचे ऋणानुबंध कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:44 IST2021-08-24T04:44:47+5:302021-08-24T04:44:47+5:30

कपिल पाटील यांनी आपली जन आशीर्वाद यात्रा समाप्त केल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. ...

Kapil Patil's bond with Badlapur Shiv Sena maintained | कपिल पाटलांचे बदलापूर शिवसेनेसोबतचे ऋणानुबंध कायम

कपिल पाटलांचे बदलापूर शिवसेनेसोबतचे ऋणानुबंध कायम

कपिल पाटील यांनी आपली जन आशीर्वाद यात्रा समाप्त केल्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी पाटील यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. कपिल पाटील खासदार होण्यात बदलापूर शिवसेनेची मोठी भूमिका होती. आज दोन पक्ष वेगळे झाले असले तरी या दोन पक्षातील वाद बाजूला सारून कपिल पाटील यांनी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली. बदलापूर येथील शिवसेना आणि खासदार कपिल पाटील यांच्यात आजही चांगले संबंध असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. याआधी वामन म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पक्षाच्या वतीने स्वागत केले होते. आता थेट कपिल पाटील घरी आल्याने शिवसेना आणि कपिल पाटील यांचे ऋणानुबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत.

---------फोटो आहे

Web Title: Kapil Patil's bond with Badlapur Shiv Sena maintained