शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणचा नवा पत्रीपूल ८४ मीटरचाच हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 01:04 IST

नव्याने आराखडा मागवला, एमएसआरडीसीसमोर नवा पेच, खर्च ३० टक्क्यांनी वाढणार

- अनिकेत घमंडी डोंबिवली : कल्याणचा ब्रिटिशकालीन उड्डाणपूल जीर्ण झाला असून तो पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे; परंतु तो पाडल्यानंतरही नव्या पुलाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वेचे तांत्रिक अडथळे पार करताना एमएसआरडीसीच्या नाकीनऊ आले आहेत. आधी ६० आणि नंतर ७२ मीटरचा पूल बांधण्याचा आराखडा एमएसआरडीसीने मध्य रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवला तरच नवा पत्री पूल मंजुरीसाठी विचाराधीन राहील, असे रेल्वे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च जवळपास ३0 टक्क्यांनी वाढणार आहे. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल, असे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी सांगितले.आधीच्या नियोजनानुसार पूल बांधण्यासाठी १४ ते १५ कोटींचा खर्च अपेक्षित होता. रेल्वे प्रशासनाने ८४ मीटरच्या पुलाचा आराखडा पाठवण्याची सूचना केल्याने, त्यामध्ये सुमारे ५ कोटींची भर पडणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची किंमत २० कोटींपर्यंत जाऊ शकते अशी माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली. सोमवारी मध्यरेल्वेच्या सूचनेसंदर्भात माहिती मिळाली. त्यानुसार आगामी आठवडाभरात नव्या नियोजनाचा आराखडा रेल्वे प्रशासनाला पाठवण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे यांनी दिली. ८४ मीटरचा पूल बांधताना एमएसआरडीसीसमोर काही अडचणी आहेत. केवळ पूल बांधणे हेच उद्दिष्ट नसते; सर्व शक्यतांचा विचार करावा लागतो.पुलाच्या जवळपास १५० ते २५० मीटर परिसरात इमारती नसणे आवश्यक असते. हा निकष तपासून काम करावे लागते. आपात्कालीन स्थितीत क्रेन किंवा अन्य यंत्रणांना पुरेसी जागा मिळावी, ही सर्वात महत्वाची बाब लक्षात घ्यावी लागत असल्याचेही बोरडे यांनी सांगितले.७२ मीटरवरून ८४ मीटरचा पूल बांधण्याचा प्रस्ताव आल्याने खर्चात वाढ होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनाच्या मागणीनुसार आठवडाभरात सुधारीत आराखडा पाठवण्यात येईल. त्यानंतर साधारण महिनाभरानंतर सर्व निकषांची तपासणी झाल्यावर रेल्वेची मंजुरी मिळेल. रेल्वेची मंजुरी प्राप्त झाल्यावरच अंतिम आराखडा बनवून प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल, असेही बोरडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kalyanकल्याण