शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण विहीर दुर्घटना: विहिरीच्या सफाईकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; गोस्वामी कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 04:36 IST

भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते.

कल्याण : पूर्वेतील भीमाशंकर मंदिराच्या शेजारील विहिरीत बुडून गुरुवारी पाच जणांचा मृत्यू झाला. याच विहिरीशेजारी एक नाला आहे. या नाल्यातील रसायनयुक्त सांडपाणी विहिरीत मिसळले जाते. त्याची सफाई करण्यात यावी, यासाठी गेली तीन वर्षे गोस्वामी कुटुंब महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. मात्र, याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप गोस्वामी कुटुंबीयांनी केला.या विहिरीच्या सफाईसाठी सफाई कामगार कमलेश यादव दुपारी २च्या सुमारास उतरला होता. तो बराच वेळ होऊनही वर न आल्याने मंदिर परिसरातील राहुल गोस्वामी विहिरीत उतरला. सफाई कामगार, त्यापाठोपाठ राहुलही बराच वेळ बाहेर न आल्याने राहुलचे वडील गुणवंत उर्फ गुणाभाई विहिरीत उतरले. मात्र, तेही बेपत्ता झाले. विजेचा धक्का लागल्याने हे तिघे बुडाल्याचा अंदाज होता. त्यामुळे खबरदारी म्हणून विद्युतपुरवठा खंडित केला.माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमनचे जवान घटनास्थळी पोहोचले. दलातील अनंत शेलार हे विहिरीत उतरत असतानाच विषारी वायूमुळे चक्कर येऊन विहिरीत कोसळले. त्यांना पडल्याचे पाहून अग्निशमन दलाचे प्रमोद वाघचौरे हे विहिरीत उतरले. मात्र, प्रमोदला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात विषारी वायूमुळे तेही विहिरीत पडले. बराच वेळ होऊनही पाचपैकी एकही जण वर न आल्याने खळबळ उडाली.अधिकाऱ्याची प्रकृती खालावलीबचावकार्यामध्ये आघाडीवर असणारे फायर अधिकारी नामदेव चौधरी यांना प्रदूषित वायूचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी स्थानिक रहिवासी, पोलीस, अधिकारी आणि पत्रकार यांनादेखील दूषित वायूमुळे त्रास झाला.खबरदारी म्हणून घटनास्थळी सुरक्षापट्टा लावण्यात आला आहे. अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. विहिरीतले पाणी ढवळल्याने त्यातून विषारी वायू मोठ्या प्रमाणात बाहेर आला आणि त्यामुळे पाच जण गुदमरले. अग्निशमन दलाला विहिरीतल्या विषारी वायूच्या तीव्रतेचा अंदाज आला नाही.

टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात