शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal : अजित पवार गटात नाराज,शरद पवारांसोबत पुन्हा परत जाणार का? छगन भुजबळांनी थेटच सांगितलं
2
Pakistan out of T20 World Cup : पाऊस आला धावून, पाकिस्तान गेला वाहून! अमेरिका Super 8 मध्ये, रचला इतिहास
3
'शरद पवार माझे आवडते नेते, माझं काम त्यांनी तीन मिनीटांत केलं होतं'; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
4
अमित शहांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची घेतली बैठक; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा घेतला आढावा
5
Maharashtra Assembly Session : राज्याचं पावसाळी अधिवेशन ठरलं! अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, किती दिवस चालणार?
6
मोठी बातमी! अमोल किर्तीकर यांना सीसीटीव्ही फूटेज देण्यास उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार
7
इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केले स्वागत, पाहा व्हिडीओ
8
अजय जडेजानं वन डे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानला मार्गदर्शन करण्यासाठी एकही रुपया घेतला नाही
9
“छगन भुजबळांनी बंड पुकारून आपले बळ दाखवावे, विधानसभेत धडा शिकवावा”: विजय वडेट्टीवार
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: वाह ‘गुरु’! मातीचे सोने करण्याची शक्ती असलेला ग्रह; चंद्राशी ‘युती’ म्हणजे ‘राजयोग’च
11
Maharashtra Politics : 'अजितदादांना सगळीकडून घेरलं,पण पक्षातील कोणच बोलत नाही'; जितेंद्र आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
12
“आमचे सरकार आले तर मराठा आरक्षणाची मागणी प्रथम पूर्ण करणार”; जयंत पाटील यांनी दिली गॅरंटी!
13
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'
14
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
15
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
16
ICC ने जाहीर केलं टीम इंडियाचं Super 8 चं वेळापत्रक; जाणून घ्या कधी, केव्हा व कोणाला भिडणार
17
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
18
Photos: तुम हुस्न परी... डिझायनर ड्रेस, फॅशनेबल गॉगल; अवनीत कौरचं 'ग्लॅमरस' फोटोशूट
19
या पेनी स्टॉकच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, किंमत ₹5 पेक्षाही कमी, एकाच महिन्यात दिला 55% परतावा!
20
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...

माणकोली पुलासह कल्याण रिंगरोडचे साडेपाचशे कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 11:39 PM

केडीएमसीची अनास्था : मंत्रालयात लवकरच बैठक

सुरेश लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोड तब्बल साडेपाचशे कोटी रुपये खर्च करून तयार होणार आहे. रिंगरोडच्या कामाची जबाबदारी कल्याण-डोंबिवली महापालिकेने झटकून एमएमआरडीएवर ढकलल्याचा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी नुकताच डीपीसीत केला. यामुळे हा निधी पडून असून खाडीपुलासह कल्याण रिंगरोड, शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयात लवकरच बैठक लावण्याच्या तयारीत आहेत.

मोठागाव-माणकोली खाडीपूल, कल्याण रिंगरोडसाठी साडेपाचशे कोटींचा निधी पडून आहे. केडीएमसी, एमएमआरडीए या कामांकडे लक्ष देत नसल्यामुळे कामास विलंब होत असल्याचा आरोप करून त्यांनी केडीएमसीला धारेवर धरले. या कामासाठी पालिका टीडीआर देत नसल्याची खंतही व्यक्त केली.तबेल्यांच्या जागा संपादनात अडचणीमोठागाव परिसरात या रस्त्यासाठी90%जमिनीचे संपादन झाले आहे. मात्र, माणकोलीच्या बाजूकडून जमिनीच्या संपादनास तीव्र विरोध होत असल्याचे भिवंडी प्रांतांकडून सांगितले जात आहे.या रस्त्यासाठी माणकोलीकडून १०० लोकांच्या जागा संपादन करायच्या आहेत. यात सर्वाधिक तबेल्यांच्या जागा आहेत. तबेल्यांच्या जागा बळकावलेल्या आहेत. यामुळे त्यांना भरपाई देता येत नसल्यामुळे या लोकांकडून जागेच्या संपादनाला तीव्र विरोध होत आहे.यामुळे या कल्याण रिंगरोडसह शीळफाटा रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री लवकरच मंत्रालयात बैठक घेऊन केडीएमसी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहे.टीडीआरमुळे विलंबया रिंगरोडसाठी सुमारे ६० टक्के जागा संपादित झाल्याचे उघडकीस आले. काही ठिकाणच्या जागांचे टायटल क्लीअर नसल्यामुळे टीडीआर देणे शक्य नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.या रस्त्याचे काम महापालिकेने एमएमआरडीएवर ढकलल्यामुळे या कामास विलंब होत असल्याचे चव्हाण यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.लोकहिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाºया या रिंगरोडच्या मोठागाव-माणकोली-खाडीपूलही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडला आहे. या कामाचे अ‍ॅलॉटमेंट दोन वेळा बदलल्याची माहिती त्यांनी दिली.कल्याण परिसरातीलवाहतूककोंडी दूर होणारमोठागाव-माणकोली खाडीपुलावरून हा कल्याण रिंगरोड पुढे मुंबई-नाशिक महामार्गास जोडला जाणार आहे. यामुळे कल्याण परिसरात होणारी वाहतूककोंडी संपणार असून काही मिनिटांतच चालकांना नाशिक महामार्गावर जाता येणार आहे.