शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

कल्याणमध्ये पोलीस आणि शिवसैनिकांत झाली शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:38 AM

पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात साकारलेला शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा शिव जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो.

कल्याण : पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात साकारलेला शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा शिव जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी केल्यास आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी नोटीस महात्मा फुले पोलिसांनी विजय तरुण मंडळाचे व्यवस्थापक विजय साळवी यांना बजावली होती. त्यानंतरही पोलिसांनी रामबाग ते आंबेडकर उद्यानापर्यंतच हा देखावा नेण्याची परवानगी दिली. मात्र, आंबेडकर उद्यानाजवळ मिरवणूक येताच संपूर्ण मिरवणुकीत हा देखावा असेल, असा आग्रह साळवी यांनी धरल्याने पोलीस व शिवसैनिकांत वादंग झाला. यावेळी शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जोरदार घोषणाही दिल्या. अखेरीस हा देखावा संपूर्ण मिरवणुकीत होता.रामबाग शिवसेना शाखेने शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकचा देखावा तयार केला होता. शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. त्यानंतर, पळून गेलेला शाहिस्तेखान पुन्हा महाराष्ट्रावर कधीही चाल करून आला नाही. शिवाजी महाराजांनी केलेले अनेक शिवप्रताप हे गनिमी कावा होेते, हे या देखाव्यात दाखवण्यात आले होते.जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय सैन्यावर केलेल्या हल्ल्यात ४६ जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन एअर सर्जिकल स्ट्राइक केला. त्यानंतरही पाकिस्तानाकडून आपले सैनिक मारले जात आहेत. त्यामुळे पाकिस्तानला कायमचे उत्तर देण्यासाठी युद्ध पुकारले जावे, अशी मागणीही या देखाव्यात करण्यात आली होती.याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी साळवी यांना नोटीस बजावली. त्यात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. त्यानंतरही पोलिसांनी रामबाग ते आंबेडकर उद्यानापर्यंतच हा देखावा नेण्याची परवानगी दिली. त्यानुसार, आंबेडकर उद्यानानजीक देखावा पोहोचताच साळवी यांनी संपूर्ण मिरवणुकीत देखावा नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पोलीस व शिवसैनिकांत वाद झाला.दरम्यान, यापूर्वीही मंडळाने अफजलखानाचा वध हा देखावा सादर करण्याप्रकरणी २०१० मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशाला अधीन राहूनच मंडळाने निर्णय घ्यावा. पुन्हा शाहिस्तेखानाची बोटे छाटली, हा देखावा सादर केल्याने कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसेच आचारसंहितेचा भंग होऊ शकतो, असा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला होता.शिवकालीन सर्जिकल स्ट्राइकच्या देखाव्यामुळे आचारसंहितेचा भंग झालेला नाही. पोलिसांकडून अगोदर दिलेली नोटीस म्हणजे आचारसंहितेचा बाऊ करण्याचा प्रकार होता.- विजय साळवी, व्यवस्थापक,विजय तरुण मंडळपोलीस काय कारवाई करणार?पोलिसांच्या नोटीसनंतर देखावा मिरवणुकीत सहभागी झाल्याने व त्यावरून वादंग झाल्याने आता पोलीस साळवी यांच्याविरोधात कोणती कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :thaneठाणे